दहावीत नापास झाल्याने नैराश्यातून विद्य़ार्थीनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

दहावीच्या परीक्षेत यश हाती न आल्याने पिंपरी (अंतुर) ता.सोयगाव येथील विद्यार्थिनीने नैराश्यातून विषारी औषध घेवून घरातच आत्महत्या केल्याची घटना ता. 8 घडली होती. या प्रकरणी प्राथमिक उपचारासाठी नगरदेवळा ता.पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, तिची प्रकृती नियंत्रणात न आल्याने उपचारासाठी चाळीसगावच्या ग्रामीण रुग्णालयात घेवून जात असतांना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला.

जरंडी: दहावीच्या परीक्षेत यश हाती न आल्याने पिंपरी (अंतुर) ता.सोयगाव येथील विद्यार्थिनीने नैराश्यातून विषारी औषध घेवून घरातच आत्महत्या केल्याची घटना ता. 8 घडली होती. या प्रकरणी प्राथमिक उपचारासाठी नगरदेवळा ता.पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, तिची प्रकृती नियंत्रणात न आल्याने उपचारासाठी चाळीसगावच्या ग्रामीण रुग्णालयात घेवून जात असतांना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी ता.9 चाळीसगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झालेली सोयगाव पोलीस ठाण्याला ता.11 वर्ग करण्यात आली आहे.

भाग्यश्री कोमलसिंग दौडे (वय16) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती चाळीसगावच्या राष्ट्रीय कन्याशाळा येथे इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होती. अल्पभूधारक जमीन असल्याने सदर विद्यार्थिनी मुलींच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. परंतु, तिला दहावीच्या नापास झाल्याने तिने नैराश्यातून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेमुळे पिंपरी(अंतुर) परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान, रविवारी तिच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुजित बडे, उपनिरीक्षक गणेश जागडे, योगेश झाल्टे, दीपक पाटील, कौतिक सपकाळ, प्रदीप पवार आदी पुढील तपास करत आहेत.

Web Title: Candidate suicides due to failed in 10 th exam