उमेदवारांची माहिती झळकणार फलकासह भिंतींवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नाशिक - निवडणुका मोकळ्या वातावरणात पार पडाव्यात व मतदारांना मतदान करताना उमेदवारांची संपूर्ण माहिती असावी, या हेतूने महापालिका निवडणुकीत मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती बॅनर तसेच भिंतींवर झळकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज माहिती देण्यात आली. त्याचबरोबर मतदारांना तक्रार करणे सोपे जावे म्हणून सिटिझन ऑन पेट्रोल (कॉप) हे ऍप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

महापालिका मुख्यालयात आज पक्षप्रमुखांची बैठक झाली. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवडणूक उपजिल्हाधिकारी सरिता नरके, उपायुक्त विजय पगार उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवाराची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यात उमेदवारावर गुन्हे असतील तर त्याचा तपशील, मालमत्तेचे विवरण, शैक्षणिक माहिती त्यावर राहणार आहे. पैसा व मद्य यांचा गैरवापर, तसेच बळाचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय 
- आचारसंहिता अंमलबजावणीसाठी मुख्यालयात एक व सहा विभागात प्रत्येकी एक कक्षाची स्थापना. 
- अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई. 
- जाहिरात, सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी स्वतंत्र समिती. 
- पैसा व मद्य यांचा गैरवापर, तसेच बळाचा वापर रोखण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती. 
- प्रचारावर नजर ठेवण्यासाठी शहरात एक हजार व्हिडिओ कॅमेरे. 
- निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना चार लाख रुपये खर्चाची मर्यादा. 
- रोजच्या खर्चाचा तपशिलासाठी https://panchayatelection.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध. 
- खर्चाचा हिशेब देण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार. 
- उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी https://panchayatelection.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध. 
- विविध परवाने व ना हरकत दाखल्यांसाठी एक खिडकी योजना. 
- मोठ्या सभांसाठी 48 तास अगोदर परवानगी आवश्‍यक. 
- मिरवणुकीत अधिकाधिक तीन वाहनांना परवानगी. 
- प्रचार सभांसाठी शहरात आठ मैदाने उपलब्ध.

Web Title: The candidates with the information displayed on the walls