Dhule Fraud Crime : नोकरीचे बनावट आदेश; 33 लाखांत फसवणूक | Candidates were cheated of Rs 33 lakhs by giving fake job orders dhule fraud crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Dhule Fraud Crime : नोकरीचे बनावट आदेश; 33 लाखांत फसवणूक

Dhule News : सोनगीर (ता. धुळे) गावातील शाळेत नोकरीचा बनावट आदेश देऊन उमेदवारांची तब्बल ३३ लाखांत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (Candidates were cheated of Rs 33 lakhs by giving fake job orders dhule fraud crime)

सत्यनारायण पांडुरंग शिंपी (रा. तुळजाभवानी इलेक्ट्रिक, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, शिंदखेडा, ह.मु. प्लॉट क्रमांक १२, संभाजीनगर, शहादा, जि. नंदुरबार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २००८ ते २०१७ दरम्यान हा प्रकार घडला.

सुनील ऊर्फ भेरूलाल हिरालाल बागूल (रा. बागूल गल्ली, सोनगीर, ता. धुळे) यांनी सत्यनारायण यांचा भाऊ हनुमंत शिंपी व भगिनी सुवर्णलता शिंपी यांना तसेच साक्षीदार व त्यांच्या नातेवाइकांना सोनगीर येथील एन. जी. बागूल शाळेत कारकून, प्रयोगशाळा सहाय्यक व उपशिक्षक अशा वेगवेगळ्या पदांवर नोकरीचे प्रलोभन दाखविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यासाठी २००९ मध्ये साडेचार लाख रुपये रोख घेतले. तसेच साक्षीदारांकडूनदेखील लाखो रुपये रोखीने घेऊन खोट्या व बनावट नोकरीचे आदेश देऊन कोणालाही नोकरीला न लावता सुमारे ३३ लाख ५० हजारांची आर्थिक फसवणूक केली. या फिर्यादीवरून सुनील बागूल याच्याविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :DhulecrimeFraud case news