चोरटयांनी विहारीत टाकलेल्या मोटरसायकली हस्तगत

विलास पगार
मंगळवार, 19 जून 2018

चोरट्यांकडून सुमारे दोन लाखांच्या चोरीच्या आठ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या होत्या. या चोरट्यांची अंबड पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या दोन मोटारसायकली चुंचाळे शिवारातील विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले.

सिडको (नाशिक) - अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये चोऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. या चोरट्यांकडून सुमारे दोन लाखांच्या चोरीच्या आठ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या होत्या. या चोरट्यांची अंबड पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या दोन मोटारसायकली चुंचाळे शिवारातील विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले.

त्यावरून अंबड पोलिसांनी आज सकाळी संबंधित विहिरीचे पाणी उपसून त्यात फेकलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या चोरट्यांकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे दोन दिवसांपूर्वी नवनाथ उर्फ डॉलर रामदास साळवे (वय19 रा. आंबेडकरनगर, वरचे चुंचाळे) याच्यासह दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खालची चुंचाळे अंबड येथील एका विहिरीमध्ये दोन  मोटार सायकली चोरी करून टाकल्याचे सांगितले . यावेळी विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे पोलिसांनी आज सकाळी क्रेनच्या साह्याने सर्व पाणी बाहेर काढले व या मोटार सायकली मुंबई नाका पोलिस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे व अंबड पोलिस ठाणे हद्दीतिल आहेत.या आरोपींविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले असून यातील एक आरोपी फरार आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे तुषार चव्हाण यांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिस हवालदार मल्ले, दत्तात्रेय गवारे, दुष्यंत जोपळे, विजय वरंदळ, अविनाश देवरे, हेमंत आहेर, दीपक वाणी, चंद्रकांत गवळी, धनंजय दोबाडे, विपुल गायकवाड, मनोहर कोळी, प्रशांत नागरे यांनी ही कामगिरी केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Captured motorcycle carrying thieves