
मालेगाव मनमाड रोडवरील चोंढी घाटात बस आणि कारचा बुधवार (ता.१८) धडक होऊन अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू तर बसमधील चार जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळी तालुका पोलिस दाखल झाले. जखमींना उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले
मालेगाव : मालेगाव मनमाड रोडवरील चोंढी घाटात बस आणि कारचा बुधवार (ता.१८) धडक होऊन अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू तर बसमधील चार जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळी तालुका पोलिस दाखल झाले. जखमींना उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्यांमध्ये गोरख बोरसे (रा.कळवाडी) यांचा समावेश आहे. अन्य एकाची अद्याप ओळख पटू शकली नाही.
अपघाताची काही दृश्ये
मयत गोरख बोरसे