नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वारिस खान, त्यांचे स्विय सहाय्यक व चालक असे तिघे नाशिककडून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली.

आश्वी : संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ आज (रविवार) पहाटे साडेचारच्या सुमारास इंजीनमधील शॉर्ट सर्किटमुळे महागडी कार जळून भस्मसात झाली. तातडीने या बाबत माहिती देवूनही महामार्ग पोलिस सकाळी साडेआठ पर्यंत घटनास्थळी पोचले नाहीत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वारिस खान, त्यांचे स्विय सहाय्यक व चालक असे तिघे नाशिककडून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली. मर्सिडीज बेन्झ एस क्लासची सुमारे एक कोटी साठ लाखांची कार डोळ्यासमोर भागीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना हताश होवून पहाण्याशिवाय खान यांच्या हाती काहीच नव्हते. सुदैवाने या घाटनेत प्राणहानी झाली नाही. मात्र या निमित्ताने टोल वसुली हेणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक सुरक्षेबाबतचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
 

Web Title: car fire on Nashik pune highway