सावधान! रेल्वेत बॅगा चोरणाऱ्या महिलांचा सुळसुळाट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

दिवाळीच्या तोंडावरील रेल्वेला असलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत, प्रवाशांच्या बॅगा लांबविणाऱ्या दोन महिलांना रेल्वे पोलिसांच्या पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून मंगला एक्‍सप्रेसमधील प्रवाशांच्या चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

नाशिक : दिवाळीच्या तोंडावरील रेल्वेला असलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत, प्रवाशांच्या बॅगा लांबविणाऱ्या दोन महिलांना रेल्वे पोलिसांच्या पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून मंगला एक्‍सप्रेसमधील प्रवाशांच्या चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

दोन संशयीतरित्या महिलांना शोधण्यात पोलिसांना यश

मध्य रेल्वेच्या मंगला एक्‍सप्रेसमध्ये दोन दिवसांपूर्वी बुधवारी (ता.९) नाशिकच्या सुशिला बाळकृष्ण कोटकर या प्रवास करत असतांना मंगला एक्‍स्प्रेसच्या नाशिक ते भुसावळ या प्रवासादरम्यान बोगी (एस-10) मध्ये गर्दीत महिलांच्या सामानाची बॅग चोरीला गेली. याप्रकरणी भुसावळ पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन ही तक्रार नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार, रेल्वे पोलिस तपास करीत असतांना, आज गुरुवारी (ता.१०) भागलपुर एक्‍सप्रेसच्या जनरल डब्यात प्रवासी लोकांच्या गर्दीत दोन संशयीतरित्या महिलांना शोधण्यात पोलिसांना यश आले. 

अडीच हजाराची रोकड हस्तगत

नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाण्यातील शिपाई आ.एस.सावंत रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक श्री.जाधव, सचिन सानप, सागर वर्मा यांच्या महिला पोलिस हवालदार श्रीमती. चव्हाण यांनी संशयित महिलांच्या झडती घेतली असता, त्यात, चोरीला गेलेल्या बॅगसह अडीच हजाराची रोकड हस्तगत करीत दोन दिवसांत मंगला एक्‍स्प्रेस मधील चोरीची उकल करण्यात पोलिसांना यश आले.पोलिसांनी याप्रकरणी कांचन उर्फ कावेरी विजय चव्हाण (वय २७), रंजना फुलचंद भोसले (वय ५०) राजवीरनगर पैठण (औरंगाबाद) अशी संशयित महिलांची नावे आहेत अशोक रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कुलकर्णी तपास करीत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Careful! Trafficking of women who stole bags in the train