जातिवाचक शिवीगाळ करत मागितली खंडणी...आणि मग....

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

रामलाल वाघ यांच्या तक्रारीनुसार, त्यांना भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत पेट्रोलपंप मंजूर झाला आहे. त्यासाठी त्यांनी ब्राह्मणगाव येथे जागा घेतली. पेट्रोलपंप सुरू करावयाचा असल्यास संशयितांनी त्यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली. तसेच, ते काही दिवसांपूर्वी पेट्रोलपंपाच्या जागेवर गेले असता, संशयितांनी त्यांच्याकडे पुन्हा ५० लाखांची खंडणी आणि दरमहा २५ हजारांचा हप्ता देण्याची मागणी केली. त्यास वाघ यांनी नकार दिला असता, संशयितांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ठार करण्याची धमकीही दिली.

नाशिक : ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथे पेट्रोलपंप उभारणाऱ्यास टोळक्‍याने जातिवाचक शिवीगाळ करीत ५० लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी मालेगाव सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार सटाणा पोलिसांत ऍट्रॉसिटी व खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले. 

तक्रार दाखल करून घेतलीच नाही

रामलाल वाघ यांच्या तक्रारीनुसार, त्यांना भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत पेट्रोलपंप मंजूर झाला आहे. त्यासाठी त्यांनी ब्राह्मणगाव येथे जागा घेतली. पेट्रोलपंप सुरू करावयाचा असल्यास संशयितांनी त्यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली. तसेच, ते काही दिवसांपूर्वी पेट्रोलपंपाच्या जागेवर गेले असता, संशयितांनी त्यांच्याकडे पुन्हा ५० लाखांची खंडणी आणि दरमहा २५ हजारांचा हप्ता देण्याची मागणी केली. त्यास वाघ यांनी नकार दिला असता, संशयितांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ठार करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी सटाणा पोलिसांत, तसेच जिल्हा अधीक्षकांकडे श्री. वाघ यांनी तक्रार केली असता, तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे वाघ यांनी मालेगाव सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने संबंधित संशयितांवर ऍट्रॉसिटी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

ही आहेत संशयितांची नावे..

विलास चिंतामण सोनवणे, दिलीप नागू आहिरे, संजय आहिरे, योगेश रमेश आहिरे, दिनेश बाळूसिंग परदेशी, प्रशांत सयाजी वाघ, भूषण यशवंत सोनवणे, कैलास धनाजी आहिरे, दिनेश रामदास बच्छाव, सोमनाथ परदेशी, दिनेश आहिरे, वर्धमान गंगाधर शिंदे, समाधान आहिरे, राहुल सिसोदे, आबा शिंदे, सुीनल कापडणीस, योगेश सोनवणे, योगेश परदेशी (सर्व रा. ब्राह्मणगाव, ता. बागलाण) अशी संशयितांची नावे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case filed of Atrocity at Nashik News