
Dhule Crime : मोगलाईतील घटनेप्रकरणी कटकारस्थानाचा गुन्हा दाखल; 16 जणांवर संशय
Dhule Crime : येथील मोगलाई भागातील भोईवाडा परिसरात एका मंदिरात बुधवारी पहाटे विटंबनेचा प्रकार निदर्शनास आला.
या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर प्राथमिक तपासातून संशयित तिघांना ताब्यात घेतले असून, पुरवणी जबाबात १६ जणांवर संशय व्यक्त झाला आहे. (case of conspiracy registered in connection with Mughlai incident dhule crime news)
शिवाय ही घटना कटकारस्थानातून झाल्याचा संशय असल्याने त्यासंबंधी कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एका संशयिताकडून वापरलेले गेलेले मद्य आणि मंदिर परिसरात आढळलेले मद्य प्राथमिक तपासणीत जुळत असून, त्याच्याविरोधात काही ठोस पुरावे हाती लागत आहेत. शिवाय त्याच्यावर याआधी गुन्हा दाखल असून, तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांवर तपास सुरू असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी दिली.
पोलिसांनी या घटनेप्रकरणी संशयित दीपक पवार, सागर पिंपळे, सचिन पगारे (तिघे रा. फुलेनगर, मोगलाई) याला ताब्यात घेतले आहे. भोई समाज सेनेचे अध्यक्ष भिलेश खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. याआधारे पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मोगलाईतील फुलेनगरजवळ मंदिर असून, दीपक जावरे आणि त्यांची आई कमलबाई जावरे देखभाल करतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांच्याकडे मंदिराच्या कुलपाची चावी असते. अनवधानाने ते कुलूप लावण्यास विसरले. यानंतर बुधवारी सकाळी सातला विटंबनेची घटना समोर आली. त्या वेळी नाना वाडिले, राजेंद्र वाडिले आदींसह मनपा स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, नगरसेवक सुनील बैसाणे उपस्थित होते.
तसेच पोलिसांचा फौजफाटा नियंत्रणासाठी होता. पोलिस अधीक्षक बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, अधिकारी योगेश राजगुरू यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी स्थिती नियंत्रणासाठी उपस्थित होते.