जितका भरणा, तितकीच रोकड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

नाशिक- सध्या चलनात असलेल्या नोटा बॅंकेत खात्यावर जमा केल्यावर तेवढी रक्‍कम तातडीने काढता येणार आहे. चलनातून बाद झालेल्या पाचशे व एक हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी हा नियम लागू नसल्याचे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा नोटा बॅंकेत जमा करणाऱ्यांना पूर्वीच्या नियमाप्रमाणे आठवड्यात 24 हजार रुपयांपर्यंतची रक्‍कम काढता येईल. रिझर्व्ह बॅंकेतर्फे जारी केल्या जाणाऱ्या परिपत्रकांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ होत असून, बॅंक कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

रिझर्व्ह बॅंकेतर्फे रोज नवीन परिपत्रक जारी केले जात आहे. रोज नव्या नियमांमुळे सर्वसामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असताना नुकताच जाहीर केलेल्या परिपत्रकामुळे या गोंधळात आणखी भर पडली आहे. 29 नोव्हेंबर किंवा त्यानंतरच्या कालावधीत बॅंकेत भरणा करणाऱ्या व्यक्‍तींना तितकेच पैसे काढता येतील, असे सांगितले जात आहे. परंतु, हा नियम केवळ चलनात असलेल्या नोटांसाठीच लागू आहे. म्हणजेच, सध्या चलनात असलेल्या पाच, दहा, वीस, पन्नास व शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा या तारखेनंतर बॅंकेत जमा केल्यास त्या बदल्यात तितकी रक्‍कम ग्राहकाला काढता येईल. चलनातून बाद झालेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा केल्यास पूर्वीच्या नियमाप्रमाणेच पैसे काढता येतील.

आरबीआयने जारी केलेल्या नियमाच्या अटी व शर्तीनुसारही ग्राहकांना पैसे देणे मुश्‍कील असल्याचे बॅंक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अद्यापपर्यंत मुबलक प्रमाणात रोकड उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात नियमांच्या क्‍लीष्टतेमुळे ग्राहक व बॅंक कर्मचारी यांच्यात वादविवाद होत आहेत.

Web Title: cash equal to deposit can be withdraw