जातवैधता प्रमाणपत्रासाठी 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नाशिक - विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादरीकरणासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढविली आहे.

नाशिक - विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादरीकरणासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढविली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार पदवी, पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 25 ऑगस्टपर्यंत असेल. पदवी अभ्यासक्रमांत प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.ई.), बी. आर्क. (वास्तूशास्त्र), हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी (एचएमसीटी) यांसह प्रथम वर्ष एमबीए, एमएमएस, प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष एमसीए, एम. आर्च., हॉटेल मॅनजेमेंटचे पदव्युत्तर पदवी एमएचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्र सादरीकरणासाठी मुदतवाढ दिलेली आहे.

Web Title: Caste Certificate Admission Education