नाशिक - पकडला दुचाकी चोर, निघाला खूनी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नाशिक : सिडकोतील दुचाकी चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याने तीन वर्षांपूर्वी एकाचा खून केल्याची कबुली दिली आहे. विशेषत: नाशिक ग्रामीण हद्दीतील मालेगाव तालुका पोलीसात अद्यापही याप्रकरणी आकस्मात मृत्युच दाखल होते. नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सदरची कामगिरी बजावली असून संशयिताकडून 1 लाख 40 हजार रुपयांच्या चोरीच्या दुचाक्‍याही जप्त केल्या आहेत. संशयिताने योगेश रमेशसिंग परदेशी (22, रा. मंगरुळ, ता. पारोळा, जि. जळगाव) याचा तीन वर्षांपूर्वी खून करून त्याचा मृतदेह झोडगे शिवारातील विहिरीत फेकून दिला होता. 

रुपेश उर्फ भुऱ्या सुरेश पाटील (रा. मंगरुळ, ता. पारोळा, जि.जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. सिडकोतील दुचाकी चोरीप्रकरणी संशयित भुऱ्याला अटक करण्यासाठी गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पथक मंगरुळ येथे गेले आणि सापळा रचून त्यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नाशिकसह नंदूरबार, पारोळा येथे दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर मात्र त्याने तीन वर्षांपूर्वी खून केल्याची कबुली दिल्याने पोलीस अवाक्‌ झाले. 

कसून चौकशी केल्यानंतर संशयित भुऱ्या याने 2015 मध्ये दोन साथीदारांसह मृत योगेश परदेशी यास शिर्डी येथे जायचे असल्याचा बहाणा करून व्हॅनमध्ये सोबत घेतले. जुन्या वादातून त्याचा खातमा करण्याच्याच उद्देशाने संशयिताने प्रवासात मृत योगेश यास दारू पाजली आणि व्हॅन मालेगाव तालुक्‍यातील झोडगे शिवारात आणली. याठिकाणी संशयित भुऱ्या याने लाकडी दांडक्‍याने योगेशच्या डोक्‍यात घाव घातला. त्यामध्ये तो मृत झाला आणि संशयित तिघांनी त्याचा मृतदेह झोडगे शिवारातील एका विहिरीत फेकून दिला होता. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद असल्याचे शहर पोलीसांनी खात्री केली. त्यासंदर्भात सखोल चौकशी केल्यानंतर व संशयिताने दिलेले वर्णन आणि अकस्मातमधील मयताचे वर्णन जुळल्याने तीन वर्षांनंतर मृताची ओळख पटली. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तर, संशयिताकडून दोन बजाज डिस्कव्हर, एक होंडा शाईन असा 1 लाख 40 हजार रुपयांच्या तीन दुचाक्‍या जप्त केल्या आहेत. 

सदरची कामगिरी आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, सहाय्यक निरीक्षक गंगाधर देवडे, उपनिरीक्षक विजय लोंढे, रवींद्र सहारे, राजेंद्र जाधव, श्रीराम सपकाळ, महेंद्र साळुंखे, बाळा नांद्रे, अन्सार सय्यद, यादव डंबाळे, संतोष ठाकूर, संजय ताजणे, देवकिसन गायकर, योगेश सानप, मोतीलाल महाजन, विजय पगारे, राजाराम वाघ, राहुल सोळसे यांच्या पथकाने बजावली.

Web Title: caught two wheeler thief but he is murderer