"सीबीएसई'च्या  परीक्षा 9 मार्चपासून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नाशिक - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांसाठीचे वेळापत्रक आज संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंडसह मणिपूर या राज्यांमध्ये 6 मार्चपर्यंत विधानसभा निवडणुकीचे मतदान चालणार असल्याने यंदा "सीबीएसई'कडून परीक्षा साधारणत: एक आठवडा उशिरा घेतली जात आहे. "सीबीएसई' शाळांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा 9 मार्चपासून सुरू होतील. बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या परीक्षा होत असल्याने विशेष विषयांसह ही परीक्षा 29 एप्रिलपर्यंत, तर नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 10 एप्रिलपर्यंत चालेल. 

गेल्या वर्षी एक मार्चपासून परीक्षेस सुरवात झाली होती. साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यात "सीबीएसई'च्या परीक्षा घेतल्या जातात; पण यंदा देशातील विविध राज्यांमध्ये निवडणुका आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत देशभरातील विविध राज्यांमध्ये शाळा कार्यरत आहेत. या शाळांच्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा एकाच वेळी घेतल्या जातात. निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी परीक्षा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होत आहेत.

Web Title: CBSE exams from nine in March