
Dhule News : वीटभट्टी भागात बसविण्यात येणार CCTV कॅमेरे
धुळे : शहरातील देवपूर भागातील वीटभट्टी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसविण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी तीन लाख रुपये निधी मंजूर करून दिला. या निधीतून परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. (CCTV camera Installation in Vitbhatti area Subhash Bhamre approved fund of 3 lakh dhule news)
वीटभट्टी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी भाजपचे सुबोध पाटील यांनी खासदार डॉ. भामरे यांच्याकडे केली होती. या मागणीला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. भामरे यांनी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला.
काही दिवसांपूर्वी वीटभट्टी येथे समाजकंटकांकडून दोन धर्मांत तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, या भागातील दोन्ही धर्मीयांकडून सामंजस्याची भूमिका घेतली गेल्याने शांतता अबाधित राहिली.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी, समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. पाटील यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी केली. तसे निवेदन खासदार डॉ. भामरे यांना दिले. या मागणीनुसार निधी मंजूर करण्यात आल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.