शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

celebrate bakari id festival
celebrate bakari id festival

मालेगाव : शहरात बकरी ईद पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरी झाली. मुख्य इदगाह मैदानासह शहर व तालुक्यात लहान मोठ्या 20 ठिकाणी सामुहिक नमाजपठण झाले. बकरी ईदचे (ईद उल अजाह) मुख्य इदगाह मैदानावरील सामुहिक नमाजपठण सकाळी साडेसात ते आठ या दरम्यान झाल्याने नमाजपठणासाठी आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. माजी आमदार व जामा मशिदीचे पेशे इमाम मौना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी नमाज पढविली. उशिरा आलेल्या नागरिकांमुळे तीन वेळा नमाज पढविण्यात आली.

या मैदानावर सुमारे वीस हजार मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. गेल्या दशकातील हा सर्वात कमी जनसमुदाय होता. मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे जातीने उपस्थित होते. अपर अधिक्षक निलोत्पल, उपअधिक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, शशिकांत शिंदे व सहकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. मुख्य ईदगाह मैदानावरील नमाज पठणानंतर आयुक्त संगीता धायगुडे, पोलिस, महसूल प्रशासन, राष्ट्रीय एकात्मता व शांतता समितीतर्फे मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

जनावरांच्या कुर्बानीपुर्वी महानगरपालिकेच्या मुख्य व तात्पुरत्या 14 ठिकाणी उभारलेल्या कत्तलखान्यांमध्ये पशु संवर्धन विभागातर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुर्बानीपुर्वी जनावरांची तपासणी केली. त्यावेळी काही जनावरे कुर्बानीसाठी नाकारण्यात आली. महापालिकेने कत्तलखान्यांवर मुबलक पाणीपुरवठा व स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. कत्तलखान्याजवळील कचरा तातडीने उचलण्यासाठी विविध वाहनांची मदत घेण्यात आली. सणानिमित्त घरोघरी खिमा, टिक्कीया, बेरई रोटी (मटनाचा खिमा भाकरी) व मांसाहारी विविध पदार्थ तयार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com