181 महिलांच्या सुरक्षेच्या मदतवाहिनीच्या क्रमांकाप्रमाणे बैठक करत स्वातंत्र्यदिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

आश्वी- कोणत्याही उपक्रमाच्या सादरीकरणात आपले वेगळेपण कायम ठेवणाऱ्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डी. के. मोरे जनता विद्यालयात मुख्यमंत्री मदतवाहिनीच्या 181 या क्रमांकाच्या प्रचार व प्रसारासाठी, विद्यालयातील 1700 विद्यार्थ्यांची 181 या अंकाप्रमाणे बैठकव्यवस्था करण्यात आली होती.

दिल्ली व नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या निर्भया प्रकरणानंतर महिलांची सुरक्षा, त्यांच्यावरील अत्याचार, छळ व कौटुंबिक छळ या बाबत मदत मिळविण्यासाठी असलेल्या 181 या मुख्यमंत्री मदतवाहिनीच्या प्रचार व प्रसारासाठी स्वातंत्र्यदिनाच्या प्रभातफेरीत पोस्टर, फ्लॅशकार्डस व घोषणांद्वारे या बाबत जनजागृती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने परिपत्रकान्वये दिले होते. त्यानुसार आपले वेगळेपण राखीत, मोरे विदयालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था 181 क्रमांक दर्शवणारी केली. त्यांच्या या वेगळ्या उपक्रमाला ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

यासाठी विद्यालयाचे प्राचार्य सुभाष सोवनणे, उपप्राचार्या पुष्पा कासार, पर्यवेक्षक भारत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
 
Web Title: Celebrate Independence Day with women safety number 181