संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी...

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

वणी (नाशिक) : येथे संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी मिरवणूक, दहीहंडी व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वणी (नाशिक) : येथे संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी मिरवणूक, दहीहंडी व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

येथील क्षत्रीय अहीर शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराज पुण्यतिथी च्या निमीत्ताने गुरुवारी, ता.९ रोजी वणी येथील दत्त मंदीर सभागृहात संत नामदेव महारांजाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर शहरातुन टाळ मृंदगाच्या गजरात भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. पालखीचे भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत करीत पुजन करण्यात आले.  यावेळी मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या. पालखीची सांगता झाल्यानंतर युवकांनी दहीहंडी फोडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री भजन  किर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी वणी, मावडी, कृष्णगांव, ओझरखेड येथील भजनी मंडळ कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाकर खनाळे, दिनकर महाले, मुकुंद सोनवणे, बाळासाहेब बोरसे, प्रमोद भांबेरे, सुनील महाले, बापु बागुल, आबा मोर, गणेश महाले आदींसह क्षत्रीय शिंपी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Web Title: Celebrating the death anniversary of Saint Namdev Maharaj ...