नांदगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नांदगाव - शहर व परिसरात मोठ्या उत्साहात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. सार्वजनिक उत्सव समितीच्या यानिमित्ताने सकाळी दहा वाजता येथील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला बाजार समितीचे सभापती तेज कवडे, तर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यांनतर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ सुमनताई निकम, प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक यु. बी.

नांदगाव - शहर व परिसरात मोठ्या उत्साहात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. सार्वजनिक उत्सव समितीच्या यानिमित्ताने सकाळी दहा वाजता येथील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला बाजार समितीचे सभापती तेज कवडे, तर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यांनतर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ सुमनताई निकम, प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक यु. बी. पदमने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी महात्मा फुलेंच्या समताधिष्ठित समाज निर्मितीच्या योगदानाबद्दल फुलेंना आदराजंली अर्पण केली. माजी सभापती डॉक्टर वाय. पी. जाधव, माजी नगराध्यक्ष प्रभाकर मोकळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, विष्णू निकम, वाल्मिक जगताप अरुण साळवे, दीपक खैरनार, मिलिंद खेडकर फुले सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष धीरज पवार राहुल भोपळे सुधाकर निकमी, विद्या माळी आदी यावेळी उपस्थित होते. 

तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारात पंचायत समिती सभापती सौ सुमनताई निकम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला एस टी कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. 

याचबरोबर तालुक्यातील श्री साई शिक्षण संस्था संचालित मोडे येथील कै.वामनराव सोनुजी पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा व ज्ञानदिप प्राथमिक आश्रम शाळेत क्रांती सूर्य ज्योतीराव फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी सरचिटणीस आण्णासाहेब पगार होते. यावेळी प्रतिमा पुजन करुन विद्यार्थ्यांनी भाषण व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्र संचालन श्री.जी बी पवार यांनी केले.

Web Title: Celebrating Mahatma Jyotiba Phule Jayanti in Nandgaon