पारंपारिक वेशभुषा व लोकनृत्य सादर करत जागतिक आदिवासी दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

येवला - येथील शासकिय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृहात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थानी संस्कृती जपत पारंपारिक वेशभुषा व लोकनृत्य सादर करत वसतीगृह ते कलंत्री लॉन्सपर्यत मिरवणुक काढण्यात आली.  

येवला - येथील शासकिय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृहात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थानी संस्कृती जपत पारंपारिक वेशभुषा व लोकनृत्य सादर करत वसतीगृह ते कलंत्री लॉन्सपर्यत मिरवणुक काढण्यात आली.  

कार्यक्रमांची सुरुवात आदिवासी क्रांतीविरांच्या प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने झाली.तहसीलदार नरेशकुमार बहिरम,पालिकेचे मुख्याधिकारी संगिता नांदुरकर, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड आदिची प्रमुख उपस्थिती होती.तहसिलदार बहिरम यांनी विद्यार्थाना जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्याची सुरवात कशी झाली व त्याचे महत्व उपस्थिताना पटवुन दिले. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी उपजतच गुण असतात. ते ओळखुन विकसित करावे हे विर एकलव्य यांच्या जिद्दिची कहाणीतून मुख्याधिकारी नांदुरकर यांनी पटवून दिले. महेद्र पगारे यांनी भगवान बिरसा मुंडा व महामानव डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांनी जनतेला दिलेली मुलमंत्र विद्यार्थाना विषद केली.प्रवीण गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश कांबळे यांनी आदिवासी बांधव अजुनहि अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्या सोडविण्यासाठी सर्वजन तत्पर असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी प्रा.जालमसिंग वळवी, पोलिस निरीक्षक भापकर तसेच नटवर वसावे, प्रमिला राऊत या विद्यार्थानी मनोगत व्यक्त केले.प्रा.युवराज घनकुटे, योगेश वळवी, सुभाष वाघेरे, अमर गावीत, संजय चौधरी, वैभव सोनवणे, खंडु बहिरम, सतोष निकम, विजय घोडेराव, गावंडे, श्रीमती वायखंडे, आशा अहिरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक गृहपाल रवींद्र झाल्टे यांनी केले. सुत्रसंचालन विकास सुर्यवंशी, सुरेखा डोलारे व प्रा.शरद पाडवी यांनी केले. भरत अहिरे यांनी आभार मानले. प्रज्ञा पाटील, भरत आहिरे, नितीन देठे, सुनिल भागवत, श्री.ससाणे, विद्यार्थी विवेक भगरे, पावलेश कोकणी, मोहन माळी, प्रदिप पाडवी, निलेश गावित, कृणाल जाधव आदींनी संयोजन केले.

Web Title: Celebrating World Tribal Day by offering traditional dance and folk dance