नांदगाव - अपंगांना साहित्यवाटप करून आंबेडकर जयंती साजरी

संजीव निकम
शनिवार, 14 एप्रिल 2018

नांदगाव : बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने आज गरजू गरीब अपंग व्यक्तींना चालणयासाठीचे वॉकर्स, काठी व कुबड्यांची साहित्ये वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

जैन ग्रुपचे सुरेंद्र नाहाटा व शाहू महाराज ग्रुपचे संस्थापक महावीर जाधव यांच्या संकल्पनेतून दीन दलित वस्त्यातील असहाय व गरजू अपंग महिला पुरुषांसाठी त्यांना चालण्यासाठीचा आधार व्हावा यासाठी मदत करण्याचे ठरले होते.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत चंदाबाई आहिरे, साहेबराव सोळसे, नामदेव खोडे, अंजनाबाई सोळसे, वसंत आहिरे, रमेश आहिरे, झिपरू सोनवणे, यांच्यासह एकूण दहा व्यक्तींना हे अपंग साहित्य वितरित करण्यात आले.

सकाळी अकरा वाजता बाबासाहेबाच्या पुतळ्याला सकाळी अभिवादन झाल्यावर पोलीस हवालदार रमेश पवार व महिला पोलीस कॉन्स्टेबल विद्या वाघमारे यांच्या हस्ते व आमदार पंकज भुजबळ, नगरसेवक नितीन जाधव, संजीव धामणे, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील भास्कर कदम नगरसेवक वाल्मिक टिळेकर वाल्मिक जगताप अरुण साळवे, विश्वास आहिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे वाटप करण्यात आले.

जैन ग्रुपचे गोकुळ नाहाटा, राजू सुराणा रमणलाल लोढा सुनील पारख विजय दगड नितेश पारख चेतन कोचर रतनलाल गदिया बाळूभाऊ चोरडिया कमलेश खिलोसिया विजयराज दर्डा तसेच शाहू हाराज ग्रुप अध्यक्ष प्रशांत गरुड दीपक मोरे प्रमोद पगारे, किरण पवार, सोमनाथ चौधरी, गौतम काकळीज, विलास लोखंडे, निलेश जाधव, प्रवीण गरुड आदींच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.

जैन ग्रुप व शाहू महाराज ग्रुपने आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अपंग व्यक्तींना आधाराचे साहित्य मिळवून दिल्याने एका विधायक उपक्रमाचा पायंडा शहरात यानिमित्ताने पडला, अशी प्रतिक्रिया आमदार पंकज भुजबळ यांनी व्यक्त केली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebration of ambedkar jayanti in nandgao with help to handicapped