सटाण्यात डॉ. आंबेडकर उत्सव समितीतर्फे जयंती संपन्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

सटाणा : महामानव, भारतीय राज्यघटनेचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, जागतिक अर्थकारण व राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समाजासाठी दिशादर्शक ठरतात. या विचारांचा आजच्या पिढीने दीपस्तंभाप्रमाणे उपयोग करावा, असे आवाहन येथील पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांनी आज शनिवारी (ता.१४) येथे केले.

सटाणा : महामानव, भारतीय राज्यघटनेचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, जागतिक अर्थकारण व राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समाजासाठी दिशादर्शक ठरतात. या विचारांचा आजच्या पिढीने दीपस्तंभाप्रमाणे उपयोग करावा, असे आवाहन येथील पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांनी आज शनिवारी (ता.१४) येथे केले.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बाबासाहेबांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर उत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय चव्हाण, प्रभारी तहसीलदार जे.टी.कुवर, उपनगराध्यक्षा सुवर्णा नंदाळे, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, पालिकेचे गटनेते काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, मनोहर देवरे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, डॉ.विलास बच्छाव, ग्राहक संघाच्या सभापती मंगला सोनवणे, उपसभापती राजेंद्र सरदार, नगरसेविका सुरेखा बच्छाव, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष भारत बच्छाव, दिलीप सोनवणे, माजी नगरसेविका सुमनबाई पवार, किशोर सोनवणे, बाजार समितीचे माजी संचालक भिका सोनवणे, जिभाऊ सोनवणे, प्रकाश बच्छाव, अशोक वसईकर आदींच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील बौद्ध समाजबांधवांतर्फे बाबासाहेबांच्या पुतळा व परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले होते. मध्यरात्री बारा वाजता शेकडो मेणबत्या पेटवून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. डॉ.सिद्धार्थ जगताप यांनी बुध्दवंदना म्हणून सूत्रसंचालन केले. 
कार्यक्रमास  नगरसेविका पुष्पा सूर्यवंशी, निर्मला भदाणे, सोनाली बैताडे, दत्तू बैताडे, दीपक नंदाळे, राहुल सोनवणे, प्रवीण बागड, राजेंद्र देवरे, आनंद सोनवणे, बहुजन समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप सोनवणे, दादा खरे, टी.एन.खरे, संजय पवार, भीमराव पवार, संजय कापडणीस, पोपट बच्छाव, करण बच्छाव, भास्कर बच्छाव, जितेंद्र पवार, किशोर ह्याळीज, राजेंद्र पवार, भिला वाघ आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

बाबासाहेबांच्या रिपाई कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली. मोटारसायकवर लावण्यात आलेले निळे झेंडे प्रमुख आकर्षण होते. सायंकाळी पाच वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या सवाद्य मिरवणुकीत बौद्ध समाजबांधव डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावरील गीतांवर तल्लीन होवून नाचत होते.

सटाणा एस. टी. आगार कर्मचारी महोत्सव समिती
येथील बसस्थानक आवारात सटाणा आगार कर्मचारी महोत्सव समितीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आवरात उभारलेले बाबासाहेबांचे भव्य होर्डिंग व रांगोळी आजचे प्रमुख आकर्षण ठरले.

राजेंद्र पवार यांनी बुध्दवंदना म्हटली. कार्यक्रमास नगरसेवक मनोहर देवरे, नगरसेविका सुरेखा बच्छाव, पुष्पा सूर्यवंशी, निर्मला भदाणे, पोपटराव बच्छाव, पी.एच.महाजन, एस.आर.कांबळे, रमेश सूर्यवंशी, केदा महिरे, दादा खरे, जितेंद्र पवार, बाळा खरे, कैलास मांडगे, किशोर सोनवणे, बच्चू सांगळे, गौतम अहिरे, नंदा बच्छाव, राजेंद्र धिवरे, डी.के.खरे, शशिकांत गरुड, अनिल जाधव, भूषण बच्छाव, राजेंद्र कपडे, दीपक बच्छाव, जयसिंग मोहिते, भारत बच्छाव, प्रकाश बच्छाव, राहुल देवरे, मंगेश ठाकरे एस.एम.साळवे, दाबीर शेख, मोहन साळवे आदि कर्मचारी उपस्थित होते. समितीतर्फे बसस्थानकात येणाऱ्या प्रवासी व कर्मचाऱ्यांना संघटनेतर्फे महाप्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आले. दरम्यान, बस्थानकाच्या प्रवेशद्वारात नगरसेविका सुरेखा बच्छाव यांनी शहरातील जयंती उत्सव इतिहासात पहिल्यांदाच क्रेनचा वापर करून डॉ.बाबासाहेबांच्या २० फुट रुंद व ६० फुट उंच आकाराचे भव्यदिव्य होर्डिंग उभारले होते. ते आजचे प्रमुख आकर्षण ठरले. तर उमेश पानपाटील (मुंजवाड) या चित्रकाराने डॉ. बाबासाहेबांच्या काढलेल्या आकर्षक रांगोळीने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. प्रवाशी व नागरिकांनी रांगोळी पाहण्यासाठीही एकच गर्दी केली होती, तर अनेकांनी ही रांगोळी व होर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये फोटोद्वारे संग्रही करून घेतली.  

Web Title: celebration of ambedkar jayanti in satana