
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा घास शनिवारी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर हिरावला गेल्याने शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात नैराश्येचे वातावरण होते. भाजप कार्यालयात मात्र जल्लोष सुरू होता; परंतु बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने बाजी एकदम पलटली. त्यामुळे शहरात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आनंद व्यक्त केला
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुंबईत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताचा ठराव संमत झाल्यानंतर शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
आज (ता.२७) शालिमार कार्यालयासमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी "शिवसेना जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या गेल्या
नाशिक : राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे राज्य आल्याने बुधवारी शालिमार येथे शिवसेना कार्यालया समोर सुरु असलेला जल्लोष ( व्हिडिओ व फोटो - सोमनाथ कोकरे)
गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा घास शनिवारी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर हिरावला गेल्याने शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात नैराश्येचे वातावरण होते. भाजप कार्यालयात मात्र जल्लोष सुरू होता; परंतु बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने बाजी एकदम पलटली. त्यामुळे शहरात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आनंद व्यक्त केला.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. "शरद पवार आगे बढो'च्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयासमोर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शनिवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यालयात ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा झाला असला, तरी बुधवारी (ता.२६) मात्र पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात मात्र सन्नाटा होता.