मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित 

मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळित 

नाशिक -  मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथील रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी आजपासून (ता.19) येत्या सोमवार (ता.22) पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे दूर पल्ल्यांच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

आजपासून सुरू झालेल्या मेगाब्लॉकमुळे सरासरी चार ते साडे चार तास रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे. येत्या सोमवारपर्यंत (ता.22) दूरपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे हे वेळापत्रक आणि वेळा विस्कळित राहील, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. 

शनिवारी (ता.20) रद्द गाड्या 
गाडी क्र. 12117/12118 एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्‍स्प्रेस. 
गाडी क्र. 51153/51154 मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर. 
गाडी क्र. 12071 दादर-जालना जनशताब्दी एक्‍स्प्रेस दु. 2 ऐवजी दु. 2.50 वा.( दादरहून) 
गाडी क्र. 11025 भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे धावेल. 
गाडी क्र. 11026 पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस व्हाया दौंड-मनमाड. 
गाडी क्र. 13201 राजेंद्रनगर-एलटीटी एक्‍स्प्रेसला ठाण्यास अंतिम थांबा. 
गाडी क्र. 11059 एलटीटी-गोरखपूर एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 12541 एलटीटी-गोरखपूर एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 11061 एलटीटी-दरभंगा एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 11071 एलटीटी-वाराणसी कामायनी एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 12188 सीएसएमटी-जबलपूर गरीबरथ एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 12617 एर्नाकुलम-हजरत निझामुद्दीन मंगला एक्‍स्प्रेस लक्षद्वीप एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 22885 एलटीटी-टाटानगर अंत्योदय एक्‍स्प्रेस सुमारे एक तास ते पावणे दोन तास उशिरा धावतील. 

रविवारी (ता.21) रद्द रेल्वेगाड्या 
गाडी क्र. 12117/12118 एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्‍स्प्रेस. 
गाडी क्र. 51153/51154 मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर. 
गाडी क्र. 11055 एलटीटी-गोरखपूर एक्‍स्प्रेस स. 10.55 एलटीटी वरून दु. एकला सुटेल. 

उशिरा धावणाऱ्या गाड्या 
गाडी क्र. 12142 पाटलीपुत्र-एलटीटी एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 12294 अलाहाबाद-एलटीटी दुरांतो एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 11060 छापरा-एलटीटी एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 11080 गोरखपूर-एलटीटी एक्‍स्प्रेस, 
गाडी क्र. 15018 गोरखपूर-एलटीटी एक्‍स्प्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com