बनावट नोटा प्रकरणातील सूत्रधार नागरेला जामीन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

नाशिक - गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये नोटाबंदीच्या काळात बनावट नोटा छपाई प्रकरणातील मुख्य सूत्रधार छबू नागरे याला आज मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. नागरे याच्यासह 11 जणांना गेल्या 23 डिसेंबर 2016 रोजी एक कोटी 35 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक करण्यात आली होती. मागील महिन्यामध्ये न्यायालयाने नागरेचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी नागरे यास आज सशर्त जामीन मंजूर केला. त्याला अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील माफीचा साक्षीदार कृष्णा अग्रवाल हा औरंगाबादच्या कारागृहामध्ये आहे. अन्य संशयितांचेही सशर्त जामीन झाले आहेत.
Web Title: chabu nagare bell in bogus currency case compere