जनता अन्‌ शरद पवारांमुळे झाला राजकीय पुनर्जन्म... 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 December 2019

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भुजबळ यांची भेट घेतल्याने नाशिकच्या राजकीय पटलावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिते विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यामुळे गिते व भुजबळ यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, गिते यांनी भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले. 

नाशिक : गेली पाच वर्षे माझी खडतर गेली. भुजबळ संपले अशी चर्चा विरोधकांनी घडवली. मात्र, माझ्या वाईट काळात अनेकांनी प्रेमाने खंबीर साथ दिली. येवला विधानसभा मतदारसंघातील जनता आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे माझा राजकीय पुनर्जन्म झाला. त्यामुळे जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळाली, असे सांगून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. 9) येथे नाशिकची रखडलेली कामे मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. 

नाशिकची रखडलेली कामे लावणार मार्गी - भुजबळ 

राज्याच्या मंत्रिमंडळात 28 नोव्हेंबरला कॅब्बिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर  भुजबळ पहिल्यांदा नाशिकमध्ये आले होते. महाराष्ट्र विकास आघाडीत समाविष्ट असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, की नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आघाडी सरकारच्या काळात बोट क्‍लबसह इतर महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण होऊनही गेल्या पाच वर्षांत ते सुरू होऊ शकले नाहीत. असे सर्व प्रकल्प लवकर सुरू करण्यास प्राधान्य असेल. कलाग्राम, मनोरंजन पार्क, ग्रेपपार्क रिसॉर्ट यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी, तसेच नवीन वाढण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 
 
अनुभवी खडसे घेतील निर्णय 

भाजपमध्ये ओबीसी नेते नाराज आहेत, या एकनाथ खडसे यांच्या आरोपात तथ्य आहे. मात्र, तो भाजपचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून, श्री. खडसे मला भेटल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की खडसे भेटले म्हणजे त्या पक्षात गेले असा अर्थ होत नाही. अनुभवी नेते असल्याने ते योग्य निर्णय घेतील. 
 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदास नाही विरोध 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास माझा विरोध नाही. त्यांच्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आहे. पक्षाध्यक्ष सर्वांना न्याय देतील, असे श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

Image may contain: 2 people, people sitting, people standing and indoor

वसंत गितेंकडून सदिच्छा भेट 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भुजबळ यांची भेट घेतल्याने नाशिकच्या राजकीय पटलावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिते विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यामुळे गिते व भुजबळ यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, गिते यांनी भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले. 

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..
 

छगन भुजबळ म्हणाले... 
- अत्याचाराच्या घटना वेदनादायी आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. कारवाई न केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. 
-खातेवाटपाचा आणि पालकमंत्रिपदाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. येत्या काही दिवसांत ते यासंबंधाने निर्णय घेतील. 
- राज्य सरकारमध्ये अनुभवी नेते आहेत. त्यामुळे सरकार टिकणार यात काहीही शंका नाही. सरकारला थोडा वेळ द्यायला हवा. मग टीका करावी. 
-धोक्‍याने सरकार आले, अशी टीका करणाऱ्यांना धोक्‍याने कसे म्हणता?, धोका कशाला म्हणतात?, अंधारात नव्हे, तर भरदिवसा शपथ घेतली नाही का, हे प्रश्‍न विचारायचे आहेत

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chagan Bhujbal Visit Nashik Political Marathi News