सप्तशृंगगडावर आजपासून रंगणार चैत्रोत्सव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मालेगाव - चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगड सज्ज झाला असून, उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते उद्या (ता. 4) सकाळी सात वाजता भगवतीची पंचामृत महापूजा होऊन उत्सवाला सुरवात होईल. दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव होणार आहे. न्यायाधीश तथा ट्रस्टच्या अध्यक्ष यू. एम. नंदेश्‍वर उपस्थित राहणार आहेत.

भगवतीचा चैत्रोत्सव रामनवमीपासून सुरू होतो. उत्सवात मंदिर 24 तास खुले राहणार आहे. भाविकांसाठी प्रसादालयात मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पौर्णिमा दहा एप्रिलला सकाळी सुरू होत असल्याने दरेगावचे एकनाथ गवळी-पाटील नऊ एप्रिलला मध्यरात्री भगवतीच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकवतील. नांदुरी ते सप्तशृंगगड हा रस्ता खासगी वाहनांसाठी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. सप्तशृंगीचा चैत्रोत्सव परिसरातील आदिवासी बांधवांसाठी पर्वणी असते. खाद्यपदार्थ, खेळणी आदींची शेकडो दुकाने थाटली जातात. आदिवासी महिला फूल-हार, देवीची ओटी, तर काहीजण औषधी वनस्पतींची विक्री करतात.

Web Title: chaitrotsav on saptshrungi gad