"सकाळ'ची दखल ः ....आणि या रस्त्याच्या दुरूस्तीला झाली सुरवात 

दीपक कच्छवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः अनेकांचे बळी घेणाऱ्या या रस्त्याच्या संदर्भात "सकाळ'ने दखल घेऊन वेळोवेळी वस्तुनिष्ठ वृत्त दिले होते. या कामासंदर्भात खासदार उन्मेष पाटील यांनीही "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर दोन दिवसांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांकडून खड्डे बुजविण्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी मागणी होत आहे. 

चाळीसगाव ते धुळे महामार्गाची दोनच वर्षांत अक्षरशः वाट लागली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यामध्ये होणाऱ्या अपघातांमुळे तीन महिन्यांत सोळा जणांचे बळी जाऊन काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या संदर्भातील एका दांपत्याची व्यथा "ट्‌विटर'वर मांडल्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी "येत्या दोन दिवसांत या रस्त्याच्या कामाला सुरवात केली जाईल' असे "ट्‌विट' केले होते. "सकाळ'ने देखील यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केली होते. या गंभीर प्रश्‍नाकडे वृत्तांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. "सकाळ'मधील बातम्यांचे फेसबुकवर वाचन होत असताना वाचकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर च्या वृत्ताची राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने दखल घेऊन खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरवात केली आहे. 

52 किलोमीटरचे काम 
चाळीसगाव- धुळे महामार्गावर धुळेपासून ते ओढरे गावापर्यंत जवळपास 52 किलोमीटरपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. चाळीसगाव शहरातून हा रस्ता जात असल्याने त्याचेही काम होईल. यासोबतच महामार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे काढण्यात येणार असल्याने रस्ता मोकळा केला जाईल, अशी माहिती राष्ट्रीय प्राधिकरण विभागाकडून देण्यात आली. यापूर्वी खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाने मागील महिन्यात मातीमिश्रीत मुरूम टाकला होता. मात्र, तो लगेचच निघून गेल्याने आता खड्डे बुजण्यासाठी मुरूम, खडी, डांबरचा वापर केला जात आहे. दरम्यान, या महामार्गावरील विंचुर नदीवरील तसेच गिरणा नदीवरील मेहुणबारे गावाजवळील असे दोन्ही पूल कमकुवत झाल्याने त्यांचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

राष्ट्रीय महामार्ग विभागाला या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात सूचना दिलेल्या होत्या. नागपूर व दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठपुरावा करून तातडीने निधी मंजूर करण्यात आला. निविदा प्रक्रियेला वेळ लागल्याने रस्ता दुरुस्तीच्या कामाला थोडा उशीर झाला होता. 
- उन्मेष पाटील, खासदार ः जळगाव मतदारसंघ 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chalisgaon dhule highway reprring unmesh patil twite