धबधब्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

चाळीसगाव - पाटणादेवी (ता. चाळीसगाव) येथील धवलतीर्थ धबधब्याच्या डोहात पाय घसरून पडल्याने योगेश्‍वर राजेश्‍वर मोरे (वय 27, रा. कुंडलवाडी, ता. नायगाव, जि. नांदेड) या तरुणाचा आज दुपारी मृत्यू झाला. 

चाळीसगाव - पाटणादेवी (ता. चाळीसगाव) येथील धवलतीर्थ धबधब्याच्या डोहात पाय घसरून पडल्याने योगेश्‍वर राजेश्‍वर मोरे (वय 27, रा. कुंडलवाडी, ता. नायगाव, जि. नांदेड) या तरुणाचा आज दुपारी मृत्यू झाला. 

याबाबत माहिती अशी की चाळीसगाव येथील खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या एका कंपनीतील दहा कर्मचारी आज पाटणादेवीच्या जंगलात फिरण्यासाठी आले होते. जंगलातील धबधब्यांना सध्या पाणी आल्याने पर्यटकांची गर्दी होती. देवीच्या मंदिरामागील धवलतीर्थ धबधबा पाहण्यासाठी हे सर्वजण गेले असता, त्यांच्यातील योगेश्‍वर याचा पाय घसरल्याने तो डोहाच्या पाण्यात पडला. डोंगरावरून धबधबा वेगात कोसळत असल्याने पाण्याच्या प्रवाहात तो काही सेकंदातच दिसेनासा झाला. या वेळी तेथे असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह त्याच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. अखेर कैलास चव्हाण या वनमजुराच्या अथक प्रयत्नांनंतर योगेश्‍वरचा मृतदेह डोहातून बाहेर काढला. 

या वेळी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पटवर्धन आदी उपस्थित होते. धबधब्याच्या ठिकाणी वनविभागाने सावधगिरीचा इशारा देणारा फलक ठळक अक्षरात लावला आहे. 

Web Title: chalisgaon news drowned

टॅग्स