चाळीसगाव- आयशर गाडीची पुलाच्या कठड्याला धडक 

दीपक कच्छवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव- धुळे महामार्गावरील ठिकठिकाणी पडलेले खड्डे जीवघेणी ठरत आहेत. आज पहाटे चारच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात फ्रिज घेऊन जाणाऱ्या आयशर गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी पुलाचा कठडा तोडून सुमारे तीस फूट खाली पडणार तेवढ्यातच अर्ध्यावर अडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. पुलाववरच आयशर आडवी झाल्याने या महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली होती. 

चाळीसगाव- धुळे रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणी खड्डे झाले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात आज पहाटे चारला औरंगाबादकडून नंदुरबारला फ्रिज घेऊन जाणारी आयशर गाडी (एम. एच. 20 सीटी 4217) मेहुणबारे जवळील पुलावर जात होती. पुलावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालक रमेश पवार (रा. वाळूज, जि. औरंगाबाद) याचा आशयरवरील ताबा सुटला व पुलाचा कठडा तोडून खाली तीस फूट खाली पडणार, तेवढ्यात चालकाने ब्रेक दाबल्याने गाडी पुलाच्या अर्ध्यावर अडकली. पुढचा भाग पुलाबाहेर तर मागचा भाग पुलावर अशी या आशयरची अवस्था झाली होती. सुदैवाने आशयर गाडी पुलाखाली पडली नाही. रस्त्याच्या मधोमध गाडी आडवी झाल्याने पुलावरून दुसऱ्या वाहनांना जाण्यासाठी जागाच नव्हती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारणतः तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. घटनास्थळी पोलिसांसह ग्रामस्थांनी अर्ध्यावर अडकलेली आयशर गाडी काढण्यासाठी मदत केली. या अपघातामुळे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. 

खड्डा घेणार जीव 
चाळीसगाव- धुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासली की नाही? असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास दुचाकी चालविताना अक्षरशः मृत्यूला सोबत घेऊन चालवावी लागते. अवजड वाहनांच्या पुढील लाईटांच्या प्रखर प्रकाशात दुचाकीचालकांना अंदाज येत नाही. अशात रस्त्यावरील खड्ड्यात गाडी आल्यास, गंभीर अपघात होण्याची भीती असते. 

गिरणा पुलाच्या दोन्ही बाजू कमकुवत 
मेहुणबारे येथील गिरणा पुलाच्या दोन्ही बाजू कमकुवत झाल्या आहेत. हा पूल सध्या वापरण्यायोग्य राहिला नसल्याने या पुलावरून चालताना भीती निर्माण होते. गिरणा नदीवर हा पूल 1970 मध्ये बांधण्यात आला आहे. या पुलाला 47 वर्षे झाली असून, त्याच्या उघड्या अँगलची मध्यंतरी थातूरमातूर डागडुजी केली होती. पुलावर उभे राहिल्यानंतर पूल हलतो. सद्यःस्थितीत किमान दोन्ही बाजूच्या कठड्यांचे भक्कम काम करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: chalisgaon truck accident