चाळीसगाव- अज्ञात माथेफिरुने फोडले महिलेचे डोके 

दीपक कच्छवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वरखेडे व दरेगाव भागातील महिलेसह तरूणींचा विनयभंग करणाऱ्या माथेफिरूने जवळच्या उपखेड (ता.चाळीसगाव) भागात आज एका महिलेचे डोके फोडून तिला जखमी केल्याचा प्रकार घडला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत. या घटनेमुळे परिसरात त्याच्याविषयी प्रचंड भीती पसरली आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वरखेडे व दरेगाव भागातील महिलेसह तरूणींचा विनयभंग करणाऱ्या माथेफिरूने जवळच्या उपखेड (ता.चाळीसगाव) भागात आज एका महिलेचे डोके फोडून तिला जखमी केल्याचा प्रकार घडला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत. या घटनेमुळे परिसरात त्याच्याविषयी प्रचंड भीती पसरली आहे. 

उपखेड येथील प्रशांत मगर यांच्या शेतात 28 वर्षीय महिला आज दुपारी एकच्या सुमारास निंदणीचे काम करीत होती. तेथे त्यांच्या मागून अचानक आलेल्या अज्ञात माथेफिरुने महिलेच्या डोक्‍यावर दगड मारला. ज्यात महिला जखमी झाली. याच अवस्थेत तिने जोरजोरात आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या शेतात काम करणारे धावून आले. या दरम्यान, दगड मारणारा माथेफिरु तेथून पसार झाला. गेल्या दोन- तीन दिवसात अशा पाच घटना या भागात घडल्या आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असला तरी संशयिताला पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. 

जंगलातील पायवाट परिचित 
वरखेडे व उपखेड परिसराला जंगलाचा मोठा भाग लागून आहे. यात दाट झाडीझुडपे आहेत. यातून सहजासहजी जाणे अवघड आहे. संशयित माथेफिरूला हे जंगल चांगलेच परिचित असल्याचे दिसून येत आहे. तो मुली व महिलांनाच "टार्गेट' करीत असल्याने शेतात जाणाऱ्या महिलांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जप्त केलेली दुचाकीची माहिती घेतली आहे. त्याला लवकरात लवकर जेरबंद करु असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी गावात दवंडी देऊन महिलांनी एकटे शेतात जाऊ नये व सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे. 

पेट्रोल संपताच दुचाकी फेकली 
उपखेड (ता. चाळीसगाव) गावाच्या बाहेर शेतात राहणाऱ्या कैलास राठोड याची दुचाकी (एम. एच. 19- 6201) माथेफिरूने चोरल्याचा संशय आहे. त्याने या दुचाकीचे पेट्रोल संपताच ती उपखेड भागातच सोडून दिली. हा माथेफिरू सराईत गुन्हेगार असून त्याचा वावर याच भागत असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: chalisgaon women attacked by unknown person