PHOTO : चांदवडचा 'हा' महाकाय खड्डा देतोय अपघातांना आमंत्रण!

दत्तात्रय बारगळ : सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

चांदवड-मनमाड रस्त्यातील खड्डा खड्डा वाचविण्यासाठी वाहनचालक खड्‌ड्याच्या बाजूने वाहने नेत असल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अवजड वाहनांना मात्र याच खड्‌ड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. या महाकाय खड्‌ड्याबरोबरच या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित अधिकारी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत काय? असा संतप्त सवाल वाहनचालक व नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून चांदवड शहर परिसरात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे चांदवड-मनमाड रस्त्याची अत्यंत दैन्यावस्था झाली असून चांदवड बसस्थानक ते शासकीय विश्रामगृह दरम्यानच्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच चांदवड-मनमाड रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालयासमोर एक तब्बल फुटभर खोल व सुमारे दहा ते बारा फूट लांबीचा महाकाय खड्डा पडल्याने हा खड्डा अपघातांना निमंत्रण देत आहे.

अपघात घडण्याची दाट शक्यता

हा खड्डा वाचविण्यासाठी वाहनचालक खड्‌ड्याच्या बाजूने वाहने नेत असल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अवजड वाहनांना मात्र याच खड्‌ड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. या महाकाय खड्‌ड्याबरोबरच या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित अधिकारी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत काय? असा संतप्त सवाल वाहनचालक व नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

No photo description available.

बेमोसमी पावसामुळे चांदवड-मनमाड रस्त्याची पुरती "वाट'

गेल्या काही दिवसांपासून चांदवड शहर परिसरात सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळे चांदवड-मनमाड रस्त्याची पुरती "वाट' लागली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खड्‌ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना पाठीचा व मणक्यांच्या आजारांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच उपजिल्हा रुग्णालयासमोर पडलेल्या महाकाय खड्‌ड्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

No photo description available.

विविध मार्गाने करण्यात आली आंदोलने

या रस्त्यावर नेहमीच मोठमोठे खड्डे पडत असल्याने विविध पक्ष व संघटनांकडून खड्‌ड्यांचा वाढदिवस साजरा करून तसेच खड्‌ड्यांना फुले वाहून गांधीगिरी मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र त्यावर बांधकाम विभागाकडून नेहमीच तात्पुरती डागडुजी करून मलमपट्टी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांदवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी आल्याने तात्काळ तात्पुरती मलमपट्टी करून या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून चांदवड शहर परिसरात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने चांदवड-मनमाड रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची पुन्हा अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून केली जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandavad's huge pothole invite for accidents