साक्ष देऊ नये म्हणून फिर्यादीला लावली रिव्हॉल्व्हर

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

जळगाव - गणेशवाडी परिसरातील रहिवासी तथा अंडालॉरी लावून कुटुंब पोसणाऱ्या व्यक्तीने गुंडाची पोलिसांत तक्रार केली म्हणून दोन वर्षांपूर्वी हल्ला करून त्याच्या मुलाचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात फिर्यादी असलेल्या दुसऱ्या मुलाची जिल्हा न्यायालयात उलटतपासणी सुरू असून, त्याने न्यायालयात येऊ नये म्हणून संशयिताच्या साथीदारांकडून रिव्हॉल्व्हर लावून धमकावण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. ५) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. आता याही प्रकरणात तक्रार करण्यात आली असून, पाटील कुटुंबीयांना मुलाच्या जिवाची भीती आहे.

गणेशवाडी परिसरात सुरेश पाटील हे दोन मुले पत्नीसह वास्तव्यास आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील भजे गल्लीत अंडालॉरी लावून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. दोन वर्षांपूर्वी लहान मुलगा भूषण याला किरकोळ कारणावरून सनी ऊर्फ चाळीस वसंत पाटील याने लोखंडी फायटर मारून जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी १७ फेब्रुवारी २०१५ ला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांत तक्रार दिली म्हणून गॅंगचा म्होरक्‍या चिंग्या ऊर्फ चेतन सुरेश आळंदे याने त्याच्या साथीदारांसह पाटील कुटुंबावर १४ मे २०१५ ला हल्ला चढवून सुरेश पाटील, मुलगा चंद्रकांत पाटील यास चाकू- चॉपरने भोसकून गंभीर जखमी केले होते. हल्ल्यात गंभीर जखमी चंद्रकांत पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू होऊन त्याचा भाऊ भूषण याच्या तक्रारीवरून औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यात जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू आहे. न्या. कटारिया यांच्या न्यायालयात शनिवारी (ता. ५) भूषण पाटील याची उलटतपासणी नोंदवण्यात आली. न्यायालयातून बाहेर पडतानाच चिंध्या ऊर्फ चेतन आळंदे याने न्यायालय आवारातच ठार मारण्याची धमकी दिली.

खुनातील संशयित
चिंग्या ऊर्फ चेतन सुरेश आळंदे, लखन ऊर्फ बोबड्या दिलीप मराठे, सनी ऊर्फ चाळीस वसंत पाटील, ललित गणेश चौधरी, लक्ष्मण दिलीप शिंदे, सागर वासुदेव पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून, चिंग्या आणि लखन दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित चौघे संशयित जामिनावर सुटले आहेत.

कोर्टनंतर सायंकाळी गल्लीत
भूषण पाटील न्यायालयाचे काम आटोपल्यावर सायंकाळी घरी आला. रात्री साडेआठच्या सुमारास होंडा हंक दुचाकीवर (एमएच १९- १३) आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्याला ढाकेवाडीत घराजवळच रस्ता अडवून मागे बसलेल्या तरुणाने रिव्हॉल्व्हर लावून ‘आज न्यायालयात आला, येथून पुढे येऊ नको,’ अशी धमकी दिल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com