जायखेड्यात चाँदशाहवली बाबांचा उरूस उत्सव उत्साहात साजरा

दीपक खैरनार
सोमवार, 30 एप्रिल 2018

अंबासन (जि.नाशिक) : जायखेडा (ता.बागलाण) येथील हिंदू - मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणुन प्रसिद्ध असलेला व पोलिस प्रशासनाच्या प्रत्यक्ष सहभागातून साजरा होणारा चाँदशाहवली बाबांचा उरूस उत्सव उत्साहात साजरा झाला.

अंबासन (जि.नाशिक) : जायखेडा (ता.बागलाण) येथील हिंदू - मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणुन प्रसिद्ध असलेला व पोलिस प्रशासनाच्या प्रत्यक्ष सहभागातून साजरा होणारा चाँदशाहवली बाबांचा उरूस उत्सव उत्साहात साजरा झाला.

यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उरूस तीन दिवस साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी जायखेडा पोलिस ठाण्यातील चाँदशाहवली बाबांच्या दर्गाची पुजा करुन चादर चढविण्यात आली. यानंतर पोलिस ठाणे ते मोसम नदीकाठावरील जुन्या इंग्रजी शाळेच्या प्रा॑गनातील बाबांच्या मुळ दर्गापर्यंत सांयकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली. बाबांच्या दर्गावर पुष्पांची चादर चढविण्यात येऊन प्रार्थना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी याञा उत्सव झाला. 

मनोरंजनासाठी शालीग्राम शांताराम रोहिणीकर धुळे यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी भव्य कुस्त्यांची दंगल झाली. नाशिक जिल्ह्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला. मोहत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार, जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.एच. गावित, पोलीस इंस्पेक्टर आर.एस. शेंडे, संरपंच शांताराम बंडू, सामाजिक कार्यकर्ते संजय बच्छाव, माजी सोसायटी सभापती अनिल अहिरे, राजेंद्र साळवे, पो.ह. राजेंद्र साळवे, पो.नाईक आर. एम सावळे, जी.बी.सोनवणे, एम. एन मोरे, बी.व्ही. नेरकर, ए.आर.थैल, आर. बी.बच्छाव, बी. व्ही. माळी, एस.डी..बोडके, के.पी. दळवी, डी.के. गायकवाड़, बी.टी.फंगाळ, निंबा पहिलवान, मच्छिद्र खैरनार, धुडकु अहिरे, जयवंत जगताप, बापु गवळे, तात्या अहिरे, तसेच मालेगांव येथील आर.सी.पी.प्लाटुनचे कर्मचाऱ्यासह  ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

Web Title: chandshahwali baba urus in jaykheda