आता "चिठ्ठी आयी है" नाही..तर एसएसएस, व्हॉट्सअप आया है...

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

पूर्वी साधे पोस्टकार्डही घरी आले, तर शेजाऱ्यांकडून कोणाचे पत्र आले म्हणून विचारणा होत होती. आप्तस्वकीयांची जिव्हाळ्याची पत्रे वाचताना अनेकदा डोळ्यांच्या कडा ओल्या होत असतं. भेटीची ओढ लागे. येणाऱ्याची वाट पाहिली जाई. सध्या काळ बदलला आहे. दूरसंचारमध्ये झालेल्या क्रांतीमुळे क्षणात बोलणे, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दूरवर असताना एकमेकांत 
समोरासमोर संभाषण होत आहे. त्यामुळे संदेशवहनाच्या पत्र प्रकाराला नवसंजीवनी मिळण्याची शक्‍यता नाहीशी झाली आहे.

नाशिक : बदलत्या काळानुसार संदेशवहनाचे प्रकारही बदलले. पूर्वी पत्राद्वारे संदेश दिले जात होते. मात्र, प्रत्येकाच्या हातात आलेल्या मोबाईलवरून संदेश जाऊ लागल्याने व्हॉट्‌सऍप, ई- मेल फुल झाले, तर दुसरीकडे पत्रपेट्या रिकाम्या राहात आहेत. कधी पोत्याने निघणारे पत्रे आता थैलीही भरत नसल्याने पोस्टमनही दिसेनासे झाले. संदेशवहनाच्या बदलाचा परिणाम लेखन कलेवरही झाला आहे. 

मोबाईलवरून संदेश; पत्रपेट्या रिकाम्या 

संदेशवहनाचे प्रकारही बदलत्या काळानुसार बदलत गेले. पूर्वी लांब असलेल्या आप्तस्वकीयांची विचारपूस, हालचाल, माहिती आदानप्रदान करण्यासाठी संदेशवहनाचे साधन म्हणजे पत्र. हाच एकमेव पर्याय होता. मात्र, दूरसंचार सेवेचे जाळे पसरले आणि प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले. त्यामुळे संदेशवहनाचे कार्य अधिक गतिमान झाले. एका क्‍लीकवर क्षणात दूरवर असलेल्या आप्तस्वकीयांशी आपण बोलू लागलो. ई-मेल, मेसेज पाठवू लागलो. मात्र, या गतिशीलतेत मनाला हुरहूर लावणारे पत्र बेपत्ता झाले. पूर्वी पत्रे पाठविली जातं. त्यावेळी पोस्टाच्या पत्रपेट्यांतून पोत्याने पत्र निघायचे. आता ती स्थिती राहिलेली नाही. पत्रपेट्यांतून मोजकेच पत्र निघत असल्याचे दिसून येत आहे. पत्रे वाटप करताना पोस्टमनची दमछाक होत असे. गाव, शहरातील पोस्टमनला प्रत्येक घर आणि व्यक्तींची नावे माहिती होती. जसे पत्र जिव्हाळ्याचा विषय होता, तसे पोस्टमनही जिव्हाळ्याचे, ओळखीचे होते.

No photo description available.

बदलत्या काळानुसार संदेशवहनाच्या प्रकारात बदल 

पूर्वी साधे पोस्टकार्डही घरी आले, तर शेजाऱ्यांकडून कोणाचे पत्र आले म्हणून विचारणा होत होती. आप्तस्वकीयांची जिव्हाळ्याची पत्रे वाचताना अनेकदा डोळ्यांच्या कडा ओल्या होत असतं. भेटीची ओढ लागे. येणाऱ्याची वाट पाहिली जाई. सध्या काळ बदलला आहे. दूरसंचारमध्ये झालेल्या क्रांतीमुळे क्षणात बोलणे, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दूरवर असताना एकमेकांत 
समोरासमोर संभाषण होत आहे. त्यामुळे संदेशवहनाच्या पत्र प्रकाराला नवसंजीवनी मिळण्याची शक्‍यता नाहीशी झाली आहे. पत्रे पाठविणे बंद झाले. त्यामुळे पोस्टकार्ड लिहिणेही बंद झाल्याने लेखन कलाही लोप पावत असल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा >थरारक अपघात....गाडीत होते खेळाडू....दीड तास गाडीच्या कॅबिनमध्ये 'तो' अडकून होता

आपले काही आहे का... 
चौक, गल्लीत पत्र घेऊन पोस्टमन येताना दिसला, की कानावर आपुलकीचा आवाज यायचा "आपले काही आहे का?' मात्र, हा आवाज आता ऐकला येत नाही. त्याचे कारण असे, की पत्रेच येत नसल्याने पोस्टमनही दिसेनासे झाले आहेत. एखादं वेळेस पोस्टमन दिसला, की आप्तस्वकीयांची पत्रे सोडून केवळ शासकीय पत्रेच येताना दिसतात. त्यामुळे पोस्टातून शासकीय दस्तावेज नागरिकांच्या घरापर्यंत पोचविण्यासाठी पोस्ट ऑफिस आता शिल्लक राहिले आहेत.  
हेही वाचा >जिल्हा न्यायालयात आगीत शेकडो फाइल खाक..कोणत्या होत्या त्या फाईल? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in the type of messaging due to digitization Nashik Marathi News