इंग्रजीच्या परीक्षेत 29 कॉपीबहाद्दर जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

नाशिक - दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत नाशिक विभागात आज तब्बल 29 कॉपीबहाद्दर पकडले. यात जळगाव जिल्ह्यातील 19 जणांचा समावेश आहे. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय तपासणीसाठी विविध पथके नियुक्‍त केली होती. या पथकांनी केलेल्या कारवाईत नाशिक विभागात 29 कॉपीबहाद्दर आढळून आले. नाशिक व धुळे जिल्ह्यांत प्रत्येकी पाच कॉपीबहाद्दर आढळून आले. तर नंदुरबारमध्ये कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही.
Web Title: cheater arrested in english paper