कर्जाच्या आमिषाने फसविणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. राकेश बापू पानपाटील (33, रा. अस्मिता बंगला, प्रियंका पार्क, गाढवे पेट्रोल पंपासमोर, जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (23, रा. कंगण सोसायटी, जयभवानी रोड, नाशिक रोड) अशी दोघा संशयितांची नावे असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

धनंजय एकनाथ महाजन (रा. लोहोणेर, ता. देवळा) यांच्या फिर्यादीनुसार ते शेतकरी असून, त्यांना कर्जाची आवश्‍यकता होती. संशयित पानपाटील, सोनवणे यांनी धनंजय महाजन यांना पाच कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले होते.

Web Title: Cheating Crime