"गुगल पे'वरून 91 हजारांना गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मोबाईल रिचार्ज करण्यासाठी रवींद्र विष्णू भंदुरे (रा. लक्ष्मी फार्म, सातपूर) यांनी "गुगल पे' या ऍपमधून आर्थिक व्यवहार केला असता, त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल 91 हजार 107 रुपयांची रक्कम गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक - मोबाईल रिचार्ज करण्यासाठी रवींद्र विष्णू भंदुरे (रा. लक्ष्मी फार्म, सातपूर) यांनी "गुगल पे' या ऍपमधून आर्थिक व्यवहार केला असता, त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल 91 हजार 107 रुपयांची रक्कम गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंदुरे यांनी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी "गुगल पे' या ऍपवरून डेबिट कार्डने आर्थिक व्यवहार केला. त्या वेळी त्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या बॅंक खात्यातून रिचार्जची रक्कम वजा होणे अपेक्षित असताना 19 हजार 999 रुपयांची रक्कम वजा झाली. याबाबत त्यांनी संबंधितांकडे दूरध्वनीवरून विचारणा केली असता, ही रक्कम जमा होईल असे सांगत, त्यांना anydisk हे ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार भंदुरे यांनी ऍप डाउनलोड केले, मात्र यांच्या बॅंक खात्यातून चार वेळा 19 हजार 999 रुपये आणि एकदा 11 हजार 111 रुपये असे 91 हजार 107 रुपये वजा झाले. या धक्कादायक बाबीनंतर त्यांनी तत्काळ अकाउंट बंद केले.

Web Title: Cheating Google Pay Crime