महिला पोलिसाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्यास ऑनलाइन 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगत संशयिताने 61 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्र करणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक - महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्यास ऑनलाइन 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगत संशयिताने 61 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्र करणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये पोलिस उपअधीक्षक, उपनिरीक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याला संशयित अनंतकुमार गुप्ता (रा. छत्तीसगड) याने मोबाईलवर संपर्क साधला. आपणास ऑनलाइन 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे त्याने सांगितले. ही रक्कम मिळविण्यासाठी जीएसटी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही रकमेची मागणी केली. त्यानुसार महिला पोलिसाने विश्‍वासाने संशयिताने सांगितलेल्या बॅंक खात्यावर 61 हजार रुपये जमा केले. मात्र तरीही संशयिताकडून पैशांची मागणी सुरूच राहिल्याने त्यांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating to Women Police Crime