महत्त्वाचे साक्षीदार महिन्यात तपासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जुलै 2016

सर्वोच्च न्यायालयाचे अादेश - सुरेशदादांचा कारागृहात मुक्काम वाढला
धुळे - जळगाव घरकुल प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयाने महिन्याभरात महत्त्वाचे (मटेरिअल) साक्षीदार तपासावेत, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने आज आरोपी माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या जामीनअर्जावरील सुनावणी महिनाभर पुढे ढकलली. त्यामुळे जैन यांचा कारागृहातील मुक्कामही वाढला आहे.

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी जैन यांनी सहा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यावर गेल्या आठवड्यात कामकाज झाले. या प्रकरणी किती साक्षीदार तपासले गेले, कामकाजाची स्थिती काय?, अशी जिल्हा विशेष न्यायालयाला विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने आज कामकाज ठेवले होते. सरकार पक्षातर्फे औरंगाबादचे ॲड. निशांत कातनेश्‍वरकर यांनी काम पाहिले. यात महिनाभराने जैन यांच्या जामीनअर्जावर सुनावणी ठेवत या कालावधीत महत्त्वाचे साक्षीदार तपासले जावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा विशेष न्यायालयाला दिला. त्यामुळे सरकार पक्षालाही रोज कामकाज करून साक्षीदार तपासणीची प्रक्रिया आटोपावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आठवड्यातून तीन दिवस जिल्हा विशेष न्यायालयात कामकाज सुरू आहे.

जिल्हा विशेष न्यायालयात आतापर्यंत फिर्यादी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांच्यासह काही अधिकारी, कर्मचारी मिळून एकूण २३ साक्षीदार तपासले गेले आहेत. अद्याप महत्त्वाच्या सहा साक्षीदारांची तपासणी राहिली आहे. पुढील कामकाज गुरुवारपासून (ता. १४) सुरू होत आहे. यामध्ये तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक आणि तपास अधिकारी इशू सिंधू यांची साक्ष सुरू होण्याची शक्‍यता आहे. ते गेल्या कामकाजावेळी साक्ष सुरू होण्याच्या शक्‍यतेने येथे उपस्थित झाले होते.

Web Title: Check out the important witnesses the month