रसायनयुक्त पाण्याचा सिडकोतील नाल्यात पूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीतून सिडको मार्गे नासर्डी नदीला मिळणाऱ्या कान्होळे नाल्याला गेल्या पंधरा दिवसांपासून रसायनयुक्त पाण्याचा पूर आला आहे. हे पाणी औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. पाण्यामुळे सिडको भागात प्रचंड दुर्गंधी, कीटकांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर किती जणांचे व किती पाणी रोखणार असा उलट प्रश्‍न करून समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीतून चुंचाळेमार्गे सिडकोत कान्होळे नाला वाहतो. या नाल्याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त पावसाळ्यात हा नाला वाहतो; परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून या नाल्याला अचानक पूर आला आहे. विशेष म्हणजे पाण्याला अत्यंत काळसर रंग असून पाण्यावर रसायनांचे थर तरंगत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Web Title: Chemical Mix Dirty Water

टॅग्स