चेतक महोत्सवाचे सारंगखेड्यात उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

सारंगखेडा - एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमित्त येथे भरणारा चेतक महोत्सव हा देशातील सर्वांत मोठा अश्‍व महोत्सव असून, त्याला महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. येथील अश्‍व बाजाराला जागतिक लौकीक मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वत: लक्ष घालून चालना दिली आहे. भविष्यात "पुष्कर'पेक्षा जास्त ग्लॅमर या महोत्सवाला आणू, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी येथे बुधवारी दिली.

सारंगखेडा येथील यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या चेतक महोत्सवाचे उद्‌घाटन मंत्री रावल यांच्या हस्ते आज झाले. आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी, महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल आदी उपस्थित होते.

Web Title: Chetak Mahotsav