छबू नागरेची पत्नी शहरातून गायब 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नाशिक - भद्रकाली पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल असलेली व बनावट नोटा प्रकरणाचा सूत्रधार छबू नागरे याची पत्नी प्रीती नागरे चार दिवसांपासून शहरातून गायब झाली. प्रीतीला चौकशीकरिता ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना घराला कुलूप पाहून आल्यापावली मागे फिरावे लागले. 

गेल्या बुधवारी (ता. 11) विशाल सुरेश दिंडे (रा. गंजमाळ) यांच्या फिर्यादीनुसार संशयित प्रीती नागरे हिच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. संशयित प्रीती ही बनावट नोटा प्रकरणातील टोळीचा सूत्रधार व "राष्ट्रवादी'चा माजी पदाधिकारी छबू नागरे याची पत्नी आहे. प्रीती नागरे व्यवस्थापिका असलेल्या मायक्रो ऍक्‍सिस सोसायटीकडून विशाल दिंडे यांनी कर्ज घेतले होते. या कर्जापोटी काही रक्कमही त्यांनी बॅंकेत भरली होती; तर उर्वरित रकमेसाठी प्रीतीने दिंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून सदरची रक्कम भरण्यासाठी धमकी दिली. अश्‍लील भाषेत तिने दिंडे यांच्याशी संवाद साधून ठार करण्याची धमकीही दिली होती. 

संबंधित गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस चौकशीसाठी प्रीती नागरेचा शोध घेत आहेत. परंतु, घराला कुलूप असल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने माघारी यावे लागले. दरम्यान, पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी एक पथकही तयार केले असून, शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, गेल्या चार दिवसांत तिला शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Web Title: Chhabu Nagare's wife disappearing