दोन वर्षांनंतर पुन्हा कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजले भुजबळ कार्यालय

bhujbal
bhujbal

येवला - गेले दोन वर्षे शांत-शांत दिसणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व येथील आमदार छगन भुजबळ यांचे कार्यालय आज समर्थक व कार्यकर्त्याच्या गर्दीने गजबजले होते. एवढेच नव्हे तर विंचूर चौफुलीवर देखील मोठी गर्दी जमली होती. नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात उच्च न्यायालयाने जामीन देताच एकच जल्लोष केला. येथील भुजबळ संपर्क कार्यालयात समर्थकांनी गर्दी केली. पेढे वाटत, गुलालाची उधळण करीत, बँजोवर थिरकत जल्लोष साजरा केला.

बातमी समजताच भुजबळांच्या येथील संपर्क कार्यालयावर समर्थकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे, जेष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, वसंत पवार, बी आर लोंढे, बाळासाहेब गुंड,नवनाथ काळे, दीपक लोणारी, रवी जगताप, अनिल दारुंटे, भूषण लाघवे, भाऊसाहेब धनवटे आदींसह कार्यकर्त्यनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शहरातील विंचूर चौफुलीवर रॅलीने समर्थक आले. विंचूर चौफुलीवर एकच जल्लोष मग झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ऍड.माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. 'कोण आला रे कोण आला, येवल्याचा वाघ आला', भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है', आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

विंचूर चौफुलीवर भुजबळ समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डी जे आणून जल्लोष साजरा केला. ऍड माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, अरुण थोरात, वसंत पवार, साहेबराव मढवई या नेत्यांसह, जि. प.सदस्य संजय बनकर, पालिका गटनेते डॉ.संकेत शिंदे, सुनील पैठणकर, हरिभाऊ जगताप, निसार लिंबुवाले, भागवत सोनवणे, अकबर शहा, मुशरीफ शहा, सचिन कळमकर, दीपक. देशमुख, सचिन सोनवणे, अविनाश कुक्कर, गोटू मांजरे, अजित मोकळ, सुभाष निकम, भागीनाथ उशीर, प्रवीण पहिलवान, दत्ता निकम, मच्छीन्द्र मढवाई, गजानन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला आघाडीच्याया शहराध्यक्ष संगीता जेजुरकर, श्यामा श्रीश्रीमाळ, राजश्री पहिलवान आदींसह कार्यकर्ते बेभान होऊन जल्लोषात गाण्यावर नाचत होते. 'आया रे राजा ,लोगो रे लोगो' ,मैं हूँ डॉन, यासारख्या गाण्यांनी प्रथमच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुमारे दोन तास हा जल्लोष सुरू होता. यावेळी कार्यकर्तेांनी पेढे वाटले.

"आजचा दिवस पाहण्यासाठी आम्ही आतुर होतो. डॉ. आंबेडकरांनी केलेल्या घटनेनमुळेच आज न्याय मिळाला.साहेबाना जामीन मिळाल्याने न्यायालयाला धन्यवाद देतो. दोन वर्षानंतर साहेब आता मतदारसंघात येतील याचाही आनंद आहे.
- ऍड.माणिकराव शिंदे,प्रदेश चिटणीस,राष्ट्रवादी

"यापूर्वीच आजचा दिवस यायला हवा होता. उशिरा का होईना न्याय मिळाला. भुजबळांचे चाहते दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत होते. आता पुन्हा कामाला सुरुवात होईल आणि भुजबळ साहेबांना आरोग्यावरही लक्ष देत येईल."
- अंबादास बनकर,जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

"बहुजनांना आता साहेबांच्या जामीनामुळे न्याय मिळाला आहे.भगवान के घर में देर है, अंधेरी नही याची प्रचिती आली आहे. मतदार संघातील विकासकामांना आता चालना मिळेल.
-सुनील पैठणकर,समता कार्यकर्ते

"खरंच मी तर म्हणेन येवल्याच्या थांबलेला विकास परत एकदा सुरू झाला असे समजा. आज खुप मोठी आनंदाची बातमी आज मिळाली. तीन वर्षांपासून हा मतदारसंघ पोरका झाला होता.त्याला पुन्हा नेतृत्व मिळेल.
-"प्रसाद पाटील,सरपंच,नगरसुल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com