Vidhan Sabha 2019 : छगन भुजबळांनी मानले मनसेचे आभार, कारण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पूर्व मधून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेण्याचा निर्णय आज घेतला. मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकारी बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुर्तडक यांच्या माघारीमुळे पूर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार एडवोकेट राहुल ढिकले व भाजपमधून ऐनवेळी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे आमदार बाळासाहेब सानप यांच्या थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

नाशिक : नाशिक पूर्व मधून अशोक मुर्तडक यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार असून तरुणांनी व सुज्ञ मतदारांनी कामाला लागा असे आदेश माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गोंदे येथील प्रचार सभेत दिले.

मनसेच्या बैठकीत बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय

पूर्व मधून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेण्याचा निर्णय आज घेतला. मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकारी बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुर्तडक यांच्या माघारीमुळे पूर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार एडवोकेट राहुल ढिकले व भाजपमधून ऐनवेळी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे आमदार बाळासाहेब सानप यांच्या थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. यावर निवडणूक तयारी नसल्याने अर्ज माघारी घेतोय असे मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले.

पूर्व मतदारसंघात मनसेच्या नितीन भोसलेंना महाआघाडीच्या पाठिंब्याची अपेक्षा
नाशिक पूर्व मधून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांची माघार घेण्याचा निर्णय आज (ता.७) घेतला. साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. पूर्व विधानसभा मतदारसंघातून माघार घेताना मध्यचे मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र अद्याप पर्यंत काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने मनसेची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.दरम्यान विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मामा ठाकरे, दिलीप भामरे तसेच अपक्ष अर्ज दाखल अहिरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर उमेदवारी करण्यावर ठाम आहे तर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे नॉटरिचेबल असल्याने तेही उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याची शक्यता आहे. अशोक मुर्तडक यांनी मला पक्षाने भरपूर काही दिले आहे. साहेब यांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal thanks MNS