ना अंगभर कपडे..ना खायला अन्न...बालपणातच आली भीकेची वेळ

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

मनमाड शहर हे भारतातील रेल्वेचे दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे देशाभरात जाण्यासाठी येथे रेल्वेची सुविधा आहे प्रसिद्ध गुरुद्वारा, शिर्डीमुळे येथे भाविकांची वर्दळ असते या वर्दळीत अल्पवयीन तसेच तरुण मुले मुली, वृद्ध हात पुढे करून भीक मागताना रोज दिसतात. ही मुले कुठली, त्यांचे आई वडील कोण, शिक्षणाचे काय, हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहे.

नाशिक : खेळण्या-बागडण्याचे, मौजमस्ती करण्याचे तसेच शाळेत जाण्याचे वय. परंतु परिस्थितीने या वयात त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आणली असून, देशभरातील विविध भाषिक भिकाऱ्यांची वर्दळ रेल्वेचे जंक्शन असलेल्या मनमाडमध्ये दिसून येते. या मुलांना ना शिक्षणाचा पत्ता ना आश्रयाचा, भीक मागून मिळेल ते खाणे आणि रेल्वेच्या आश्रयाने झोपणे त्यामुळे ना शिक्षण, ना लग्न, ना चांगले जीवन, ना उत्तम आरोग्य, आला दिवस ढकलत राहण्याशिवाय या भिकारीमुलांपुढे पर्याय नाही. उद्याच्या भारताचे भविष्य, हे तरुणांच्या हाती आहे असे असतांनाही ही तरुण भिकारी मुले मात्र भविष्याच्या शोधात आपला भारत धुंडाळतांना दिसतात. 

Image may contain: 2 people, people smiling, closeup
मनमाड शहर हे भारतातील रेल्वेचे दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे देशाभरात जाण्यासाठी येथे रेल्वेची सुविधा आहे प्रसिद्ध गुरुद्वारा, शिर्डीमुळे येथे भाविकांची वर्दळ असते या वर्दळीत अल्पवयीन तसेच तरुण मुले मुली, वृद्ध हात पुढे करून भीक मागताना रोज दिसतात. ही मुले कुठली, त्यांचे आई वडील कोण, शिक्षणाचे काय, हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहे. यामध्ये काही मराठी, काही हिंदी, बंगाली, गुजराथी, कन्नड, बिहारी, तेलगू भाषिक तर  काहींची भाषाही कळत नाही कुणी हाकलून देते, तर कुणी मजा घेतो, तर काही एक-दोन रुपये देतात. एकाने दिले की लगेच दुसऱ्याकडे हात पुढे, असा त्यांचा प्रवास दिवसभर सुरू असतो.

Image may contain: 8 people, including Vijay Gurav, people sitting

कुणी खायला दिले तर खायचे नाहीतर येथील गुरुद्वारामध्ये दुपारी मिळणारे मोफत जेवण खायचे अंघोळ नाही, फाटलेले, तोकडे, मळकट कपडे त्यामुळे दुरूनच लोक भीक देतात. या लहान मुलांचा निरागस चेहरा पाहून बरेच नागरिक हळहळतात खायला देतात परंतु या भीक मागण्यामध्ये त्यांचे भविष्य मात्र टांगणीला लागते. सकाळ पासूनच भीक मागावी लागत असल्याने शिक्षणाची सोय नाही. ही मुले अशिक्षित आहे एकीकडे आपण सर्वांसाठी शिक्षनाची वलग्ना करतो तर दुसरीकडे भिकारी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर होत आहे.

Image may contain: 3 people, people sitting

कधीही शाळेचे तोंड न पाहिलेली ही मुले भीक मागून पोट भरणार, रेल्वेच्या अथवा इतरत्र आश्रयाला जाऊन झोपणार या पलीकडे यांचे विश्व नाही शिक्षणाची वेगळी सोय नाही की लग्न होत नाही, चांगले जीवन जगता येत नाही, चांगले आरोग्य नाही अनेकांचे जन्म दाखल्यांपासून ते आधारकार्ड पर्यंत कोणतेही पुरावे नाही या शहरातून त्या शहरात असा प्रवास करत भारतभर त्यांचा प्रवास सुरु असतो सततच्या स्थलांतरामुळे ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहात आहेत. 

Image may contain: 1 person, sitting, shoes and outdoor
लहानपणापासून भीक मागण्याची, मुक्त फिरण्याची सवय असल्याने या भिकारी मुलांवर कुणाचे बंधन, धाक नाही त्यामुळे ही मुले व्यसनाधीन होतात चांगले राहणे, उत्तम आरोग्य नसल्याने त्यांना विविध व्याधीं, आजार, रोगांची लागण होते इतकेच नाही तर ही लहान, तरुण मुले गुन्हेगारीकडेही वळलेली दिसतात काही गुन्हेगार भिकारी मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करतात 

Image may contain: 1 person, child and closeup

आथिर्कदृष्ट्या देशाची प्रगती होत असली, तरी देशातील महत्त्वाच्या शहरांत  भिकाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात अल्पवयीन, तरुण भिकाऱ्यांची वाढती संख्या हे मोठे आव्हान आहे त्यामुळे भिकाऱ्यांना अन्न आणि निवारा देण्यासाठी मदतकेंदांनी पुढे येणे महत्वाचे आहेच परंतु सरकारनेही त्यासाठी पावले उचलणे गरजेचे  आहे मात्र केवळ अन्न आणि निवारा पुरेसा नसून त्यांच्यासाठी शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण सुविधा देखील उपलब्ध होणे आवश्यक आहे  

Image may contain: 6 people, people smiling, people sitting and child

अर्धनग्न तान्हुल्या मुलांना कडेवर घेतलेल्या महिला, एका पायाने किंवा हाताने दिव्यांग, दोन्ही डोळ्यांनी अंध तर अनेक भिकारी शरीराने धट्टेकट्टे आहेत भीक मागणे हा त्यांचा धंदा झाला आहे. यात त्यांना पैसेही चांगले मिळतात. लहान मुले सोबत असल्यावर भीक जास्त मिळते. मुलांना भीक मागायला लावून मिळालेल्या पैशावर पालक दारू पितात, मौजमजा करतात
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child beggers in manmad nashik