मालेगावात मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मालेगाव - शहरातील सनाउल्लानगर भागातील उजैफामलिक अब्दुल रहेमान (वय 13) हा सहावीत शिकणारा शाळकरी मुलगा मंगळवारी (ता. 22) सायंकाळी शहराजवळील गिरणा बंधाऱ्यात गेला असता, पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ऐन रमजान काळात अब्दुल रहेमान कुटुंबीयांमध्ये या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास त्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला.

उजैफामलिक दुपारी साडेचारच्या सुमारास घराबाहेर पडला. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची चौकशी सुरू केली. परिसरात शोध सुरू असतानाच काही मुलांनी तो गिरणा नदीवर पोहण्यासाठी गेल्याचे सांगितले. रात्री बाराच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले.

Web Title: child death by drowm in dam

टॅग्स