हौदात पडून बालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पांढुर्ली (जि. नाशिक) - खेळता खेळता घराबाहेरील हौदात पडल्याने स्वराज गाडे या एक वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शिवडे (ता. सिन्नर) येथे आज सकाळी घडली. शिवडे गावालगत असलेल्या गाडे वस्तीवरील विजय गाडे यांचा एक वर्षाचा स्वराज सकाळी आठच्या सुमारास घराबाहेर खेळताना घरातील माणसांची नजर चुकवून हौदात पडून बुडाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना काही वेळानंतर लक्षात आली.
Web Title: child death in water tank

टॅग्स