Dhule Crime News : लग्नासाठी आलेल्या बालकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child died in accident with truck shindakheda dhule news

Dhule Crime News : लग्नासाठी आलेल्या बालकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

शिंदखेडा (जि. धुळे) : येथील काकाजी मंगल कार्यालयासमोर लग्नसमारंभासाठी आलेल्या बालकाचा ट्रकने (Truck) दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

शनिवारी (ता. १८) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली असून मनोहर कैलास पाटील (वय ८ रा. सुरत उधना) असे मृत बालकाचे नाव आहे. (child died in accident with truck shindakheda dhule news)

एका विवाह समारंभासाठी मनोहर त्याची आई व मामा सोबत आले होते. विवाह आटोपून जेवण झाल्यावर कार्यालयाबाहेर झाडाखाली ते उभे होते. कार्यालयासमोर असलेल्या रसवंतीवर मनोहर व त्याचे मामा संदीप पाटील उसाचा रस पिण्यासाठी गेले.

रस पिऊन परत येत असताना रस्ता ओलांडताना शिंदखेड्याकडून दोंडाईचाकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने (एमएच ०४ पी ८७८२) जोरदार धडक दिली. यात मनोहर जखमी झाला. पुढील उपचारासाठी त्यास शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. कुंदन वाघ यांनी मृत घोषित केले. मनोहर पाटील हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. नझीरोद्दीन बशीरोद्दीन शेख (वय ४५ मुल्लावाडा कासोदा रोड एरंडोल) असे ट्रकचालकाचे नाव आहे. संदीप पाटील यांच्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे. ए. बी. पवार हे तपास करीत आहे.