झाडाखाली दाबले गेलेले चारचाकी वाहन.
नयन हिवरे.
झाडाखाली दाबले गेलेले चारचाकी वाहन. नयन हिवरे.sakal

नंदुरबार : अंगावर झाड कोसळून बालकाचा जागीच मृत्यू

त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावरदेखील ते झाड कोसळले

तळोदा - मामाच्या घरी अंगणात खेळणाऱ्या बारावर्षीय बालकाचा अंगावर झाड कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. २६) दुपारी तळोद्यात घडली. नयन अविनाश हिवरे असे मृत बालकाचे नाव असून, एकुलता मुलगा गमावल्याने आईने आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्याच वेळी तेथून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावरदेखील ते झाड कोसळले मात्र सुदैवाने वाहनातील नागरिक बचावले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली.

तळोदा शहरातून नंदुरबारकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यालगत असणाऱ्या एकलव्य पुतळा परिसरात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास लहान मुले खेळत होती. त्याच वेळी परिसरातील मोठे लिंबाचे झाड अचानक कोसळले. तेथे खेळत असणाऱ्या बालकांपैकी सायकल चालविणारा नयन अविनाश हिवरे (वय १२) झाडाखाली दाबला गेला. त्यात त्याचा मृत्यू झाला. झाडाखाली नयन दाबला गेल्याचे लक्षात येताच बालकाच्या नातेवाइकांनी व परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याला झाडाखालून बाहेर काढले व त्यानंतर उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. त्या ठिकाणी खेळत असलेली नूतन राहुल राणे (वय ७) हिलादेखील पायाला दुखापत झाली.

दरम्यान, झाड कोसळले त्याच वेळी या रस्त्यावरून चारचाकी वाहन (एमएच १९, एपी २२७५) तेथून जात होते, ते वाहनदेखील झाडाखाली आले. त्यामुळे त्या वाहनाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने त्या वाहनात बसलेले नागरिक बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात सर्वत्र पसरली. घटनास्थळी पुत्तन दुबे, संदीप परदेशी, नगरसेवक संजय माळी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, पालिका कर्मचारी मोहन सूर्यवंशी यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.

मृत नयन हिवरे हे बालक व त्याचे कुटुंबीय शहरातील मोठा माळीवाडा परिसरातील स्वामी समर्थ चौक परिसरात राहतात. नयन सहावीच्या वर्गात शिकत असून, तो मामांकडे नेहमीप्रमाणे आला असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. या प्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार सुधीर गायकवाड तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com