PHOTOS : तब्बल तीन दिवस विहिरीत तसाच होता चिमुकला...शेवटी..

संतोष घोडेराव : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

मध्यप्रदेशातून मजूर कामासाठी आलेल्या कुवारसिंग जाधव यांचा मुलगा अर्जुन कुवारसिंग जाधव (वय ४) हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना शेतकरी राजेंद्र सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत मंगळवारी (ता.२६) पडल्याची खळबळ जनक घटना घडली. विहिरीत मुलगा पडल्याने इतर मुलांनी आरडा ओरडा केल्याने शेजारीच सोनवणे यांच्या शेतात काम करीत असलेल्या शेतमजूर यांनी विहिरीकडे धाव घेतली.

नाशिक : अंदरसुल येथे विहिरीत पडलेल्या चार वर्षीय बालकाचा अखेर तीन दिवसानंतर मृतदेह शोधून बाहेर काढण्यात चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनच्या टीम यश आले.

Image may contain: outdoor

अशी घडली अंदरसुल येथील दुर्दैवी घटना 

मध्यप्रदेशातून मजूर कामासाठी आलेल्या कुवारसिंग जाधव यांचा मुलगा अर्जुन कुवारसिंग जाधव (वय ४) हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना शेतकरी राजेंद्र सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत मंगळवारी (ता.२६) पडल्याची खळबळ जनक घटना घडली. विहिरीत मुलगा पडल्याने इतर मुलांनी आरडा ओरडा केल्याने शेजारीच सोनवणे यांच्या शेतात काम करीत असलेल्या शेतमजूर यांनी विहिरीकडे धाव घेतली. सायंकाळी साडे पाच वाजता शेतमजूर कुवारसिंग जाधव यांचा मुलगा विहिरीत पडल्याच्या घटनेची माहिती राजेंद्र सोनवणे यांनी पोलिसांना देताच पोलीस नाईक ज्ञानेश्वर हेंबाडे,संदीप पगार, तलाठी कमलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली.

Image may contain: outdoor and water

बालकाचा तीन दिवसानंतर मृतदेह हाती

यासाठी बुधवारी (ता.२७) सकाळी दहा वाजता मुलाचा मृतदेह शोधण्यासाठी कोपरगाव येथील खाजगी शोध पथक बोलून शोधमोहीम करून ही मुलाचा मृतदेह हाती लागला नाही. तरी ही शोधकार्य सुरू असतांना दुसऱ्या दिवशी 28 नोव्हेंबरला पुन्हा निफाड तालुक्यातील चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे शोध व बचाव पथकाचे अध्यक्ष सागर गडाख, वैभव जमदाडे, सुरेश शेटे, विलास गांगुर्डे यांच्या टीमने विहिरीत पंचेचाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत पाईप टाकुन शोध मोहीम सुरू केली. पाण्यात पडलेल्या बालकाचा पाईपच्या साहाय्याने अंदाज घेत गळाच्या साहाय्याने सकाळी दहा वाजता शोध मोहीम सुरू केल्यानंतर तब्बल तीन तासानंतर दुपारी एक वाजता तीन दिवसापासून पाण्यात पडलेल्या मुलाचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Image may contain: 2 people, outdoor and nature

हेही वाचा > रात्रीच्या वेळेस 'कोणीतरी' अज्ञात फिरतयं शिवारात....गावकऱ्यांमध्ये घबराट

 > गंगापूर धरणावरील त्या बोटीच्या शोध लागणार? 

> पत्नीच्या निधनानंतर बाप पोटच्या मुलीसोबतच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child dies after falling into a well Nashik Marathi News